बँकासमोर पावसाळ्यात ग्राहकांच्या सोयीसाठी शेड नसल्याने उडवला जतोय सोशल डिस्टेंसिंगचा फज्जा

0

जळगाव (प्रतिनीधी) : बँकेत दररोज येणाऱ्यांची संख्या अधिक प्रमाणात पाहावयास मिळत असते. त्यात उन्हामुळे आणि पावाळ्यात ग्राहकांची सोय व्हावे यासाठी बँकेसमोर व्यवस्था करणे आवश्यक आहे. मात्र शहरातील काही बँकासमोर पावसाळ्यात ग्राहकांच्या सोयीसाठी शेड नसल्याने ग्राहकांना पावसातच बँकेसमोर उभे राहावे लागत आहे. बँकेने व्यवस्था केलेली नसल्याने पावसात ग्राहकांचे हाल होत आहे. पावसापासून बचावासाठी बँकेसमोर टेन्ट किंवा मांडव टाकावे अशी मागणी होत आहे.

जळगाव जिल्ह्यातील कोरोनाची वाढत असलेली रुग्ण संख्या चिंतेचा विषय बनला आहे. अत्यावश्यक सेवेत येणाऱ्यांना प्रशासनाकडून काही नियम अटी व शर्तीचे पालन करूनच सुरु ठेवण्याचे आदेश दिले गेले आहेत. त्यानुसार प्रत्येक बँकेच्या ठिकाणी सॅनिटायझरसह टेम्परेचर चेक करण्याची व्यवस्था करणे आवश्यक आहे. मात्र बँका सॅनिटायझरची व्यवस्था करत नसल्याने कोरोना संसर्गाचा धोका वाढण्याची शक्यता आहे.

बँकेच्या कोणत्याही कामासाठी जातांना फक्त पाच लोकांनाच प्रवेश दिला जात आहेत. तर बाहेर नागरिकांचे रागच राग पाऊसात भिजत असल्याचे दिसले.

 बाहेर सोशल डिस्टंसिंगच्या फज्जा
पावसाळ्यात कोरोना वाढण्याची भीती नाकारता येत नाही. त्यामुळे आता सर्वात जास्त काळजी घेण्याची गरज आहे. पण बँकेत तशी काळजी घेत नसल्याचे दिसून आले. बँक ऑफ बडोदाच्या कम्पाऊंड आहे. तेथे उन्हाळ्यात ग्रीन शेड लावले गेले आहे. व दोन दिवसापासून पाऊस सुरु असल्याने बँकेत पत्र्याचे शेड न लावल्यामुळे नागरिक पाऊसात भिजत असल्याचे दिसून आल्यावर बँक ऑफ बडोदाचे व्यवस्थापक यांच्याशी त्याबाबतीत विचारणा केल्यावर व्यवस्थापकाने उडवाउडवीचे उत्तरे दिले. कधी नागरपालिकांकडून पत्रे लावण्याची परवानगी मिळाली नाही तर कधी आम्हाला लावायचा नसल्याचा खुलासा दिला. तसेच व्यवस्थापकांनी नागरिकांनी स्वतःची काळजी घायला पाहिजे.सर्व सुविधा आम्ही कसे देणार असल्याचे सांगितले.

Leave A Reply

Your email address will not be published.