शेअर बाजाराच्या घोडदौडीला ब्रेक, सेन्सेक्स-निफ्टीत मोठी घसरण

0

मुंबई: शेअर बाजाराच्या विक्रमी दिशेकडे सुरु असणाऱ्या घोडदौडीला बुधवारी ब्रेक लागला. बाजार उघडल्यानंतरच सेनेक्स (Sensex) आणि निफ्टीची घसरण सुरु झाली. दुपारी साडेबारापर्यंत सेन्सेक्स 96 अंकांनी घसरुन 52492 च्या पातळीवर पोहोचला. तर निफ्टी-फिफ्टीमध्येही 26 अंकाची घसरण होऊन हा निर्देशांक 15746 च्या स्तरावर पोहोचला.

मारुती सुझुकी, बजाज फिनसर्व, हीरो मोटोकॉर्प, टायटन आणि हिंडाल्को या कंपन्यांच्या समभागांची किंमत आज वधारली. तर विप्रो, श्री सीमेंट, अडाणी पोर्ट, कोटक महिंद्रा आणि टीसीएस कंपनीच्या समभागांची किंमत घसरताना दिसली. अडाणी पोर्टचा समभाग 1.14 टक्क्यांनी घसरुन 734च्या पातळीवर पोहोचला आहे.

‘सेन्सेक्स’चा 53 हजारांच्या शिखराला स्पर्श

मुंबई शेअर बाजाराचा प्रमुख निर्देशांक ‘सेन्सेक्स’ने मंगळवारी 53 हजारांच्या शिखराला स्पर्श केला होता. मंगळवारी शेअर बाजाराने विक्रमी सुरुवात केली होती. सुरुवातीच्या व्यवहारात सेन्सेक्सने 53012.52 वर पोहोचत नवी उंची गाठली होती. मात्र, नफेखोरीमुळे सेन्सेक्स 53 हजाराची पातळी फार काळ राखू शकला नाही.

मात्र, मंगळवारी अदानी समूहातील कंपन्यांचे समभाग चांगलेच वधारले होते. अदानी टोटल गॅस, अदानी पॉवर, अदानी ट्रान्समिशन, अदानी ग्रीन एनर्जी आणि अदानी पोर्ट्सच्या शेअर्सच्या किंमती वाढल्या होत्या. त्यामुळे अदानी समूहाच्या संपत्तीत तब्बल 5 अब्ज डॉलर्सची भर पडली होती.

Leave A Reply

Your email address will not be published.