मुस्लिम समाजाला आरक्षण मिळावे ; नाना पटोलेंकडे खिदमते मिल्लत फाउंडेशनतर्फे मागणी

0

फैज़पुर (प्रतिनिधी) : काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या कडे खिदमते मिल्लत फाउंडेशन फैज़पुर तर्फे मुदस्सर नजर यांचा नेतृत्वाखाली सैय्यद फारुक इमरान खान,कामील खान,यांनी मुस्लिम समाजाला शैक्षणिक व सामाजीक क्षेत्रात पाच टक्के आरक्षण मिळाले या साठी निवेदन देण्यात आले

स्वतंत्र्य काळापासून मुस्लिम समाजाने खुप बलिदान दिले पण जसा जसा काळ लोटत गेलं मुस्लिम समाज हा दुलर्शीत झाला.

हा मागासलेपणा दुर करण्यात साठी मुस्लिम समाजास आरक्षण देणे गरजेचे आहे या मागणीचे निवेदन खिदमते मिल्लत फाउंडेशन फैज़पुर तर्फे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यानां देण्यात आले सोबत रावेर यावल विधानसभा मतदारसंघा चे लोक प्रिय आमदार शिरीष दादा चौधरी होते खिदमते मिल्लत फाउंडेशनचे अध्यक्ष मुदस्सर नजर यांनी नाना पटोले यांचे स्वागत केले यावेळी खिदमते मिल्लत फाउंडेशनचे उपाध्यक्ष फारुक जनाब सचिव इमरान खान कामील खान उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.