शेंदुर्णी येथे गरुड महाविद्यालयात मेळाव्याचे आयोजन

0

शेंदुर्णी :- येथील गरुड महाविद्यालयात २६ एप्रिल रोजी शेंदुर्णी सेकं एज्यू संस्थेचे अमृत महोत्सवी वर्ष तसेच संस्थेचे विद्यमान अध्यक्ष संजयरावजी गरुड यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून माजी विद्यार्थी व पालक -शिक्षक विद्यार्थी मेळाव्याचे आयोजन करण्यात आलेले आहे. महाविद्यालयातील तसेच परिसरातील माजी विद्यार्थी पालक व मान्यवरांना उपस्थिती बाबत अवाहन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. वासुदेव आर. पाटील व आयोजन समितीच्या वतीने करण्यात येत आहे.

महाविद्यालयात सकाळी ९.३० वा मेळाव्याचे उदघाटन मान्यवरांच्या हस्ते होईल. त्यानंतर होणाऱ्या मेळाव्यात विद्यार्थी – पालक व शिक्षक यांच्यात होणाऱ्या परीसंवादात सर्वाना सहभाग घेता येईल. महाविद्यालयात विद्यार्थी व शिक्षकांसाठी ध्यान केंद्राची निर्मिती करण्यात आलेली असून त्यात बोधीसत्व तथागत भगवान गौतम बुद्ध यांच्या मुर्तीची स्थापना करून केंद्राचे उदघाटन देखील मान्यवरांच्या हस्ते करण्यात येणार आहे.या प्रसंगी स्नेहभोजनाचे देखील आयोजन करण्यात आलेले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.