शेंदुर्णीत नगरपंचायतीतर्फे मोफत कोविड लसीकरण

0

शेंदुर्णी ता. जामनेर, लोकशाही न्यूज नेटवर्क 

शेंदुर्णी येथील नगरपंचायतीच्या वतीने शुक्रवार दि. १० डिसेंबर रोजी सकाळी ९ ते दुपारी ४ वाजेपर्यंत मोफत कोविड लसीकरणाची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.

यापुर्वी दोन भव्य शिबिराच्या माध्यमातुन शहरातील नागरिकांचे मोठ्या प्रमाणावर लसीकरण माजी मंत्री आ. गिरिश महाजन, जी.एम. फाऊंडेशन, शेंदुर्णी नगरपंचायतीच्या माध्यमातुन लसीकरण करण्यात आले होते. यात पहिला व दुसरा डोस देण्यात आला होता. यात प्राथमिक आरोग्य केंद्र शेंदुर्णी, गोदावरी फाऊंडेशन जळगाव, आशा सेविका, भाजपा शेंदुर्णी शहर व सामाजिक कार्यकर्ते यांचे सहकार्य लाभले आहे.

शुक्रवारी पहिला व दुसरा डोस देण्यात येणार आहे. यासाठी आधारकार्ड व मोबाईल सोबत आणणे महत्त्वाचे आहे. तरी अधिकाधिक नागरिकांनी याचा लाभ घेऊन लसीकरण करून घेऊन प्रशासन, नगरपंचायतीच्या कार्यास हातभार लावत सहकार्य करावे असे आवाहन नगराध्यक्षा विजयाताई खलसे, उपनगराध्यक्षा चंदाबाई अग्रवाल, मुख्याधिकारी साजिद पिंजारी, सर्व नगरसेवक, पदाधिकारी कर्मचारी यांनी केले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.