शिवांगी बेकर्स पारले कंपनीच्या मनसे कामगारांचे आंदोलन सहाव्या दिवशीही सुरूच

0

खामगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क 

शिवांगी बेकर्स कंपनी मधील कामगारांवर कंपनी संचालकांकडून अनेक वर्षांपासून मोठ्या प्रमाणात अन्याय सुरू आहे, तो अन्याय दुर व्हावा आणि कामगारांना त्यांचा हक्क मिळावा या करीता कामगारांनी मोठ्या संख्येने एकत्रित येत महाराष्ट्र नवनिर्माण कामगार सेनेचे सभासद स्विकारले आहे.  त्यानुसार कंपनी संचालकांशी वेळोवेळी मनसे पदाधिकाऱ्यांनी संवाद साधत कामगारांवर अन्याय करु नका त्यांना त्यांचा हक्क द्या, फक्त संवादच नाही तर संबंधित संचालकाबरोबर लेखी पत्रव्यवहार केला.

परंतु सर्व प्रयत्न फेल ठरले मनसेचे सभासद स्विकारलेल्या कामगारांना कंपनीने त्रास देणे सुरूच ठेवले अखेर कामगारांनी एकत्र येत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या नेतृत्वात कंपनी काम बंद आंदोलनाची हाक दिल्यानंतर कामगार अधिकारी यांनी आंदोलक व कंपनी संचालक यांच्यात चर्चा घडवून आणण्याकरिता आंदोलनाच्या पाचव्या दिवशी दिनांक १४/१२/२०२१ ला कामगार अधिकारी आनंद राठोड बुलढाणा यांनी संयुक्त बैठक आयोजित केली होती.

या बैठकीला कामगार व मनसे पदाधिकारी उपस्थित होते, परंतु ऐनवेळी कंपनी मालकाने हेकेखोरपणा दाखवत संबंधित अधिकारी यांना आम्ही कामगारांसोबत चर्चेस तयार नसल्याचे पत्र देत पुन्हा एकदा कंपनी मालकाने त्याचा हेकेखोर पना दाखवून दिल्याने कामगार व कंपनी मालक यांच्यात चर्चा होऊ शकली नाही, म्हणून महाराष्ट्र नवनिर्माण कामगार सेनेच्या कामगारांनी काल संध्याकाळी आंदोलन मंडपात मनसे पदाधिकारी प्रमुख नेते मंडळीच्या नेतृत्वात तातडीने बैठक घेत पुढील आंदोलन आणखी तीव्र करणार असल्याचे सांगितले  आहे.

यावेळी मनसेचे उपाध्यक्ष विठ्ठल लोखंडकार हे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या  औरंगाबादच्या दौऱ्यात  असल्याकारणाने ते हजर होऊ शकले नाही तरी त्यांना कामगार व कंपनी मालक यांची चर्चा फेल झाल्यावर आंदोलकांनी तातडीची बैठक घेऊन पुढील आंदोलन तीव्र करत असल्याची माहिती कामगार सेनेचे चिटणीस  निलेश पाटील यांनी फोनवरून दिली आहे.

यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण कामगार सेनेचे नेते निलेश पाटील, अक्षय पनवेलकर, अक्षय परवडी, जिल्हा उपाध्यक्ष अशोक पाटील, शहराध्यक्ष आनंद गायगोळ, शहर उपाध्यक्ष आकाश पाटील, अभिजित महानकर हे आंदोलन मंडपातील बैठकीत सहभागी झाले.

याप्रसंगी कंपनीचे युनिट अध्यक्ष गोपाल चरखे, दिलीप गिठ्ठे, राम शिंदे, विशाल घोगले, मनोज लांडगे, प्रशांत सुरोशे, निलेश श्रीनाथ, गजानन घ्यार, भागवत ठाकरे, नितीन कोळसे, भरत वरघट, दीपक मोडकर, आकाश कोल्हे, राहुल येडे, दीपक वानखडे, प्रविण तायडे, विलास वरघट सह मोठ्या संख्येने कामगारांची उपस्थित दिसुन आली.  आज दिवसभरात एकही कामगार कंपनीमध्ये गेला नसल्याने कंपनीमध्ये सहाव्या दिवशी शुकशुकाट दिसून आला हे विशेष..

 

Leave A Reply

Your email address will not be published.