शिवसेनेच्या पाठीशी महिला भगिनींनी ठामपणे उभे राहावे – कामिनी शेवाळे

0

धरणगाव, विनोद रोकडे –

धरणगाव येथे प्रथम ती महिला संमेलनात सौ कामिनी शेवाळे यांनी मनोगतात
अडचणीच्या वेळी कुटूंबाला आधार देणारी महिलाच असते. महिला भगिनींचा सन्मान, आदर करणारी संघटना म्हणजे शिवसेना आहे. महिला, युवती यांच्या रक्षणासाठी शिवसैनिक बांधव सदैव सज्ज असतात. बचतगटाच्या माध्यमातून महिलांना सक्षम करण्यासाठी शिवसेनेने मोठे काम केले आहे. त्यामुळे रक्षणकर्त्या शिवसेनेच्या पाठीशी महिला भगिनींनी ठामपणे उभे राहावे असे जोरदार आवाहन शिवसेनेच्या मुंबई नगरसेविका कामिनी शेवाळे यांनीयेथे शिवसेनेच्या वतीने आयोजीत प्रथम ती महिला मेळाव्यात बोलतांना केले.

जळगाव ग्रामीण विधानसभा मतदारसंघाचा धरणगाव येथे शिवसेनेचा प्रथम ती महिला मेळावा पार पडला. या मेळाव्याला मार्गदर्शक म्हणुन सौ शेवाळे व शिवसेनेचा मुंबई चा नगरसेविका यांची उपस्थिती होती. धरणगाव येथे मार्गदर्शन करतांना कामिनी शेवाळे म्हणाल्या की, मराठी माणसाला सक्षमपणे उभे करण्यासाठी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेनेची स्थापना करुन न्याय देण्याचे काम केले आहे. हाच समर्थ वारसा घेऊन शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे हे सक्षमपणे शिवसेनेची धुरा सांभाळत आहेत. शिवसेनेने कायमच महिलांना आदर व सन्मानाची वागणुक दिली आहे. महिलांनी शिवसेनेच्या भगव्याखाली एकत्र येऊन समाजकारणासाठी पुढे येण्याची आवश्यकता आहे. स्थानिक स्वराज्य संस्थेत महिलांना ५० टक्के आरक्षण देण्यात आले आहे. या माध्यमातून फक्त छोटी स्वप्ने न पाहता मोठे स्वप्न ठेवुन समाजकारण व राजकारणात महिलांनी कार्यरत व्हावे. शिवसेनाप्रमुखांच्या आशीर्वादाने पहिल्यांदा मी वयाचा 19 व्या वर्षी . नगरसेविका झाली हे फक्त शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी संधी दिली आहे. एखाद्या कुटूंबातील कर्त्या पुरुषाने आत्महत्या केली तरीही डगमगुन न जाता कुटूंबाला सावरण्याचे काम महिला करत असते. संसाराचा गाडा चालवितांना काटकसरीने पैशाची साठवणुक देखील महिला करतात. पतीला जेव्हा अडचण येते तेव्हा साठवलेले हे पैसे देणारी हक्काची घरची बँक म्हणजे महिलाच असून महिला भगिनींनी शिवसेनेला साथ देऊन पाठबळ द्यावे, असे आवाहन त्यांनी केले.

यावेळी व सद्या जोशी यांनी शिवसेनेच्या माध्यमातून होत असलेले समाजकार्य, महिलांच्या विषयीचे कार्य याबाबत मार्गदर्शन केले यावेळी उपस्थित जळगांव ग्रामीण चे उमेदवार व सहकार राज्य मंत्री गुलाबराव पाटील शिवसेना जिल्हा प्रमुख गुलाबराव वाघ मुंबई चा नगरसेविका सद्या जोशी तेजस्विनी घोसाळकर जळगांव ग्रामीण महिला संपर्क प्रमुख रचना पाटील प्रभारी नगराध्यक्ष अजली विसावे सभापती सुरेखा अनिल पाटील सौ कापनडे आश्विनि भाटीया माजी नगराध्यक्ष सुरेश चौधरी पी एम पाटील सर जि प सदस्य प्रतापराव पाटील संजय पाटील सर गजानन नाना पाटील गटनेते पप्पू भावे वासुदेव चौधरी विजय महाजन शिवसेना शहर प्रमुख राजेंद्र महाजन शिवसेनेचे सर्व नगरसेवक नगरसेविका उपस्थित होते सुत्रसंचालन माजी नगराध्यक्ष उषा वाघ यांनी केले तर आभार प्रभारी नगराध्यक्ष अजली विसावे यांनी आभार प्रदर्शन केले

Leave A Reply

Your email address will not be published.