साताऱ्यात उदयनराजेंच्या विरोधात ”यांच्या” नावाची चर्चा

0

सातारा : सातारा लोकसभा पोटनिवडणूक आगामी विधानसभा निवडणुकांसोबतच घेतली जाणार आहे. पोटनिवडणूक जाहीर होताच साताऱ्यातून उदयनराजेंच्या विरोधात निवडणुकीला माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचं नाव चर्चेत आलं आहे. तसेच सिक्किमचे माजी राज्यपाल आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते श्रीनिवास पाटील यांचंही नाव चर्चेत आलं आहे. त्यामुळे उदयनराजेंविरोधात तगडा उमेदवार देण्यासाठी काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीने कंबर कसली आहे.

पृथ्वीराज चव्हाण यांना तातडीने दिल्लीत सोनिया गांधींकडून बोलावणं आल्याची माहिती सूत्रांनी दिली. तसेच, याबाबत शरद पवार आणि सोनिया गांधी यांच्यात पुन्हा चर्चा झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यामुळं या दोघांपैकी एक जण उदयनराजेंच्या विरोधात लढण्याची शक्यता आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.