शिवपूर कन्हाळ्यात दोन हजार 800 लीटर रसायन नष्ट

0

भुसावळ (प्रतिनिधी)- तालुक्यातील शिवपूर कन्हाळा बुद्रूक येथे शुक्रवारी पहाटे सहाला नाल्यालगत सुरू असलेल्या गावठी हातभट्टींवर तालुका पोलिसांनी धाड टाकत 13 ड्रममधील दोन हजार 800 लिटर रसायन जागेवरच फेकले तर एक लाख सहा हजार 900 रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला. शिवपूर कन्हाळे येथे गावठी दारूच्या भट्यांवर पिरू गंगा गवळी हा व्यक्ती दारू गाळत असताना तालुका पोलिस ठाण्याचे निरीक्षक रामकृष्ण कुंभार व सहकार्यांनी छापा टाकून दारूच्या भट्या नष्ट केल्यात. यात गुळ, महू, नवसागर मिश्रीत गरम व कच्चे रसायन असलेले पाच ड्रम सुमारे एक हजार लिटर रसायन रस्त्यावर फेकून देण्यात आले तसेच 60 लिटर तयार दारू जप्त करण्यात आली.तसेच

शिवपूर कन्हाळा खुर्द येथे गोबाधी नाल्यात हिरू गवळी याच्या गावठी दारूच्या हातभट्टीवर पोलिसांनी छापा टाकला. त्या ठिकाणी 9 ड्रम दारूचे कच्चे रसायन सुमारे 1 हजार 800 लिटर आणि 30 लिटर तयार गावठी दारू जप्त करण्यात आली. 70 हजार 200 रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला.

Leave A Reply

Your email address will not be published.