शिवजयंती निमित्ताने भुसावळात होणार वकृत्व स्पर्धा

0

भुसावळ – हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांचे कार्य आणि विचार बालमनावर रुजावेत या हेतुने अंतर्नाद प्रतिष्ठान भुसावळ आणि पंचायत समिती शिक्षण विभाग यांच्यातर्फे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्त विध्यार्थी यांच्यासाठी शहरस्तरीय आणि शिक्षकांसाठी तालुकास्तरीय वकृत्व स्पर्धा १० फेब्रुवारी रोजी आयोजित करण्यात आली आहे.

वकृत्व स्पर्धा ३ गटात होणार असुन प्रत्येक गटातील ३ विजेत्या स्पर्धकांना रोख रक्कम, स्मृतिचिन्ह,प्रमाणपत्र देण्यात येइल.सहभागी  सर्व स्पर्धकांना प्रमाणपत्र देउन प्रोत्साहन दिले जाणार आहे.

पहिला गट तिसरी ते चौथी साठी असुन जिजाऊंचा शिवबा ,छत्रपती शिवरायांचे बालपण, शिवराज्याभिषेक वेळ ३ मिनिटे,दुसरा गट पाचवी ते सातवी साठी असुन  छत्रपती शिवाजी महाराज व त्यांचे स्वामिनिष्ठ मावळे,छत्रपती शिवाजी महाराजांची गुणवैशिष्ट्ये,जाणता राजा छत्रपती शिवाजी महाराज वेळ ४ मिनिटे,तिसरा गट आठवी ते दहावी साठी असुन उत्तम प्रशासक छत्रपती शिवाजी महाराज ,गडकोट किल्ले व छत्रपती शिवाजी महाराज, मी छत्रपती शिवाजी महाराज भोसले बोलतोय वेळ ५ मिनिटे हे विषय वकृत्वासाठी असणार आहे.तर ह्या वेळेस पहिल्यांदाच तालुक्यातील शिक्षकांन साठीही स्पर्धा असुन चौथ्या गटासाठी बाल शिवाजी घडविण्यात आजच्या शिक्षकाची भूमिका ,21 व्या शतकात शिवाजी महाराज अवतरले तर….,जिजाऊंचे बाळकडू आधुनिक काळाची गरज ,शिवराय नक्की कोणाचे?, रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज हे विषय असणार आहे आणि वेळ ७ मिनिटे असणार आहे.

या सदर्भातील महत्त्वाची बैठक काल दिनांक ५ रोजी पार पडली आणि यात नियोजनाच्या दृष्टीने महत्वपूर्ण चर्चा झाली.यावेळी संजय भटकर,श्रीकांत जोशी,नाना पाटील,अमितकुमार पाटील,देव सरकटे,पंकज पाटील,आर धनगर,आर कापडणे विक्रांत चौधरी,श्याम दुसाने,योगेश इंगळे,परेश सपकाळे आदी उपस्थित होते.

स्पर्धा १० फेब्रुवारी रोजी सकाळी ८:३० वाजता भुसावळ येथील म्युनिसिपल हायस्कूलमधे होणार आहे.स्पर्धकांनी अधिक माहिती साठी प्रकल्प प्रमुख जीवन महाजन ७५८८८१५३८४,प्रकल्प समन्वयक हेमांगीनी चौधरी ९३७३१११८४५, सह समन्वयक समाधान जाधव ९०२२४६४९८१ ,शैलेंद्र महाजन,प्रदीप सोनवणे,अमित चौधरी यांच्याशी संपर्क साधावा.सदर स्पर्धेत जास्तीत जास्त स्पर्धकांनी सहभागी व्हावे असे आवाहन प.स. गटशिक्षणाधिकारी तुषार प्रधान

शिक्षण विस्तार अधिकारी, शिक्षण विभाग, पंस रागिणी चव्हाण अंतर्नादचे अध्यक्ष संदीप पाटील यांनी केले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.