शिरीष मधुकरराव चौधरी महाविद्यालयात एकदिवसीय राष्ट्रीय परिषद संपन्न

0

धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनी संस्थेच्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त शिरीष मधूकरराव चौधरी महाविद्यालय जळगाव येथे एकदिवसीय “Emerging Trends In Physical Sciences & Chemical Sciences (ETIPSACS -2020)” या परिषदेचे उदघाटन प्र. कुलगुरू प्रा. डॉ. पी. पी. माहूलीकर (कबचौ उमवि जळगाव) यांच्या हस्ते करण्यात आले उदघाटन प्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून मा. आमदार शिरीषदादा मधूकरराव चौधरी संस्थेचे अध्यक्ष, श्री सुनिल पाटील उपाध्यक्ष, डॉ. पी. आर. चौधरी (सचिव), डॉ. हिमांशू अग्रवाल (संपादक एसियन जरनल ऑफ पब्लीकेशन), प्रा. आर. एस. बेंद्रे (रासायनिक विज्ञान विभाग कबचौ उमवि जळगाव), प्रा. श्रीमती प्रवीना उगीले (भौतिकशास्त्र विभाग डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ औरंगाबाद), साईका इक्राम (जामिया मिलीया इस्लामिया सेन्ट्रल युनिव्हरसिटी नवी दिल्ली) महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आर. बी. वाघुळदे, प्रा. डॉ. मिलिंद काळे, प्रा. राजश्री पाचपांडे, प्रा. डॉ. राजकुमार लोखंडे, प्रा. अनिल सोनवणे, प्रा. डॉ. रविद्रं लढे आदी मान्यवर उपस्थित होते.

राष्ट्रीय परिषदेच्या उदघाटन प्रसंगी आपल्या मनोगतातून प्र. कुलगुरू प्रा. डॉ. पी. पी. माहूलीकर यांनी विद्यार्थ्याने संशोधनासाठी प्रवृत्त होणे ही काळाची गरज आहे. राष्ट्रीय परिषदांच्या माध्यमातून उत्तर महाराष्ट्र परिसरातील विद्यार्थ्यांना भारतातील वेगवेगळ्या संशोधकांची व त्यांच्या संशोधनाची ओळख होते. या परिषदेच्या आपणास निश्चितच फायदा होईल असे मार्गदर्शन केले.

कार्यक्रमाचे अध्यक्ष मा. आमदार शिरीषदादा मधूकरराव चौधरी यांनी “लोकसेवक मधूकरराव चौधरी यांच्याकडून प्रेरणा घेऊन चळवळीच्या निमित्ताने संस्थेची स्थापना करण्यात आली. गरीब आणि होतकरू विद्यार्थ्यांना सर्वोत्तपरी मदत करतो. राष्ट्रीय परिषदेच्या निमित्ताने तज्ञ मार्गदर्शकांचे आपणास मार्गदर्शन मिळेल” असे मनोगत व्यक्त केले.

डॉ. हिमांशू अग्रवाल संपाक एसियन जनरल ऑफ पब्लीकेशन यांनी “शोधनिबंधाचे लेखन कसे कराव व त्याचे सादरीकरण कसे करावे उत्कृष्ट जनरर्ल्स मधून प्रसिध्द करून संशोधनास मान्यता राष्ट्रीय व आंतराष्ट्रीय मान्यता प्राप्त करून घेता येते.” या बद्दल मार्गदर्शन केले.

प्रथम सत्रात प्रो. आर. एस. बेंद्रे यांनी “Agro Chemicals & Pesticides” या विषयावरील बीजभाषणातून पदार्थ विज्ञानातील किरणोत्सर्ग व र्भातिक वस्तू यांचा असलेला सहसंबंध स्पष्ट केला. किरणोत्सर्ग तंत्रज्ञानाद्वारे आज कर्करोगासारख्या असाध्य आजारांवर सहजपणे उपचार करता येतात याचे दुष्पपरिणाम आज माणसाला भोगावे लागत आहे असे अनेक असाध्य आजारांना आपण आमंत्रण दिले आहे असे मार्गदर्शन केले.

तिसऱ्या बिजभाषणातून प्रा. साईका इक्राम यांनी “Polymer Chemistry” या विषयावर मार्गदर्शन केले. प्रेझेंटेशन द्वारे आपले शोधनिबंधाचे सादरीकरण केले आणि 50 संशोधकांनी पोस्टर प्रेझेंटेशन द्वारे पोस्टर सादर केले.

समारोप प्रसंगी डॉ. आर. आर. किनगे (श्रीमती जी. जी. खडसे कॉलेज, मुक्ताईनगर) आणि डॉ. व्ही. व्ही. गिते ( रसायनशास्त्र विभाग कबचौ उमवि जळगाव), महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आर. बी. वाघुळदे, प्रा. डॉ. मिलिंद काळे, प्रा. डॉ. राजकुमार लोखंडे, प्रा. राजश्री पाचपांडे हे उपस्थित होते.

उत्कृष्ट पेपर प्रेझेंटेशन प्रथम पारितोषिक-  कविता पाटील ( फिजिकल सायन्स) प्रथम पारितोषिक – आर.एम.पाटील ( केमिकल सायन्स)

उत्कृष्ट पोस्टर प्रेझेंटेशन प्रथम पारितोषिक- मोरे कमलेश ( केमिकल सायन्स) प्रथम पारितोषिक- थोरात सुभदा ( फिजिकल सायन्स )यांना देण्यात आले.

या राष्ट्रीय परिषदेसाठी भारतातील विविध राज्यांतून आंध्रप्रदेश, गुजरात, महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, येथून 112 संशोधक प्रतिनिधी, उपस्थिती नोंदविली. या परिषदेसाठी भारतातील तज्ञ संशोधक मार्गदर्शकांनी केले.

राष्ट्रीय परिषदेचे संशोधन निबंध यूजीसी मान्यता प्राप्त प्रकाशातून प्रकाशित करण्यात येणार आहेत.

या परिषदेचे प्रास्ताविक प्राचार्य डॉ. आर. बी. वाघुळदे यांनी केले. सूत्रसंचालन प्रा. डॉ. राजकुमार लोखंडे आणि प्रा. स्वप्निल पाटील यांनी केले. सदर परिषदेच्या यशस्वितेसाठी महाविद्यालयातील शिक्षक्-शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी मोलाचे सहकार्य केले.

 

Leave A Reply

Your email address will not be published.