नगरसेविका शशी कोलते अपात्र; जिल्हाधीकारी यांचा निकाल

0

वरणगाव – तालुक्यातील वरणगाव नगर परिषदेतील शिवसेनेच्या एकमेव सदस्या शशी संजीव कोलते यांना जिल्हाधीकारी यांनी नगर परिषदेची थकबाकीदार व अतिक्रमण केल्यान  अपात्र ठरवले आहे

वार्ड क्र ९मधील नगरसेविका शशी संजीव कोलते यांनी आपल्या वार्डतील गट क्र ८६१ मधील प्लॉट क्र २८ मध्ये अतिक्रमण करून पक्के बांधकाम केले असुन नगर परिषदेची थकबाकी भरली नसल्याने व गट क्र ४८१ मधील जागेवर अतिक्रमण करूण खुल्या भुखंडावर गेट टाकून अतिक्रमण केल होते अशी तक्रार मुख्याधिकारी व जिल्हाधिकारी यांच्या कडे कोमलजीत हरजितसिंग आनंद व महेश सुपडू सोनवणे यांनी तक्रार केली होती या बाबत मुख्याधिकारी यांनी थकबाकी व अतिक्रमणाबाबत खुलासा पाठवल्यानतंर जिल्हाधिकारी अविनाश ढाकणे यांनी कोलते यांना अपात्र ठरविले आहे मात्र या बाबत नगर परिषदेला किंवा नगरसेविकेला अपात्रतेचे पत्र प्राप्त झालेले नाही

या आधीही भा जपाचे पाच नगर सेवक ( खडसे  गटाचे ) हे अपात्र झाले होते मात्र त्यांना राज्यम त्र्यानी स्थगिती दिली होती त्याच प्रमाणे हा ही प्रकार त्याच प्रमाणे होण्याची शक्यता आहे

Leave A Reply

Your email address will not be published.