शिरागडच्या सप्तश्रृंगी देवी मंदीरातील ३ दानपेट्या लंपास

0

यावल, लोकशाही न्यूज नेटवर्क 

शिरागड येथील देवी सप्तश्रृंगी मंदीरातील तीन दानपेटी अज्ञात चोरट्यांनी लंपास केल्याची घटना समोर आला आहे. याप्रकरणी यावल पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

यावल तालुक्यातील शिरागड येथील देवी सप्तश्रृंगी येथील मंदीराच्या तीन दानपेट्या बाहेरच असतात. मंदीराच्या बाहेर असलेल्या तीन दानपेट्या अज्ञात चोरट्यांनी २६ ऑक्टोबर रोजीच्या पहाटे ३ ते ४ वाजेच्या सुमारास लंपास केली. हा प्रकार लक्षात आल्यानंतर मंदीरातील विश्वस्त यांनी यावल पोलीसात धाव घेतली.  शांताराम सदू सोळंके (वय ७१, रा. शिरागड ता. यावल) यांच्या फिर्यादीवरून यावल पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी  पुढील तपास पोहेकॉ संजय देवरे करीत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.