शिरसाड येथील ग्रा.पं.निवडणूकीच्या कार्यक्रमाला दि.२३ डिसेंबरपासून सुरुवात

0

यंदाचा निवडणूक कार्यक्रम संगणकीकृत पद्धतीने

निवडणूक रंगदार होणार असल्याचे संकेत ! 

साकळी ता.यावल (वार्ताहर) येथून जवळच असलेल्या शिरसाड ता.यावल या गावाला सध्या ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणुकीचे वेध लागलेले असून येत्या दि.२३ डिसेंबरपासून निवडणुकीच्या कार्यक्रमाला प्रत्यक्षपणे सुरुवात होणार असून कोविड- १९ संसर्गाबाबत खबरदारी म्हणून या निवडणुकीचा कार्यक्रम संगणककीकृत पद्धतीने राबविला जाणार आहे . गावातील एकूण चार वार्डातून अकरा ग्रामपंचायत सदस्य निवडून जाणार आहे. सध्या गावातील काही इच्छुक उमेदवारांकडून या निवडणुकीसाठी मोर्चेबांधणी केली जात आहे. गावातील सध्याची राजकीय परिस्थिती पाहता या निवडणूकीत किमान दोन किंवा तीन पॅनलमध्ये सरळ लढत होणार असल्याचे चिन्ह दिसत असल्याने ही निवडणूक अतिशय रंगतदार होते की काय ? हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आह

याबाबत सविस्तर असे की शिरसाड ता यावल येथील  ग्रामपंचायतीच्या कार्यकारिणीचा दि .३१ जाने २०२० रोजी कार्यक्रम संपला होता यानंतर च्या काळात कोविड संसर्गाच्या  पार्श्वभूमीवर संबंधित यंत्रणेकडून नविन निवडणूक कार्यक्रम न घेता सदर  ग्रामपंचायतीवर प्रशासक अधिकारी नेमण्यात आले होते .  दरम्यान नुकत्याच निवडणुक यंत्रणेकडून ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला . त्याअंतर्गत शिरसाड येथील ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणूकीचा सुद्धा समावेश आहे . या निवडणुक कार्यक्रमा अंतर्गत दि २३ डिसें. पासून प्रत्यक्ष कार्यक्रमाला संगणकीकृत पद्धतीने सुरुवात होत आहे. यात दि.२३ डिसें. ते ३० डिसें. २०२० यादरम्यान (सुट्टीचे दिवस वगळून)  नामनिर्देशन पत्र सादर केले जाणार आहे. यानंतर दि.३१ डिसें. रोजी नामनिर्देशनपत्रांची छाननी केली जाणार असून दि . ४ जाने.२०२१ पर्यंत नामनिर्देशन पत्र मागे घेण्याची मुदत आहे. दि. ४ जाने.२०२१ रोजीच निवडणुकीचे चिन्ह वाटप व  निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांची अंतिम यादी प्रसिद्ध केली जाणार आहे. दि.१५ जाने २०२१ रोजी मतदान होणार असून दि १८ रोजी मतमोजणी होणार आहे.

सदर ग्रामपंचायतीच्या येत्या निवडणुकीसाठी मतदारांच्या अंतिम यादीनुसार गावातील एकूण मतदार संख्या २२५५ आहे. त्यापैकी ११६४  पुरुष व १०९१ महिला मतदार आहे .त्याचप्रमाणे या निवडणुकीसाठी संबंधित निवडणूक विभागाकडून वार्ड निहाय आरक्षण काढण्यात आलेले आहे यात (वार्ड क्र.१) मध्ये ओबीसी महिला, जनरल महिला, एसटी जनरल अश्या तीन जागा,

(वॉर्ड क्र.२) मध्ये एससी जनरल, ओबीसी महिला, एसटी महिला अश्या तीन जागा (वॉर्ड क्र.३) मध्ये एसटी जनरल, जनरल महिला अश्या दोन जागा तर (वॉर्ड क्र.४) मध्ये एसटी महिला, जनरल पुरुष, ओबीसी पुरुष अश्या तीन जागा असून गावातील चारही वार्डातून एकूण ११ सदस्य निवडून येणार आहे.तर सरपंचपदाचे आरक्षण अजूनपर्यंत निघालेले नसल्याने त्या पदाचे आरक्षण दि.२२ रोजी निघणार आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.