गरीब गरजू लाभार्थ्यांना मोफत धान्य द्या ; रिपाइंचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

0

जळगाव । जिल्ह्यातील गरीब गरजू लाभार्थ्यांना मार्च २०२१ पर्यंत मोफत धान्य देण्यात यावे यासाठी आज १४ डिसेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडीयाच्या वतीने आंदोलन करण्यात आले. जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांना विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले.

 

काय म्हटलं आहे निवेदनात?

दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, देशात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्याकरीता २३ फेब्रुवारी २०२० पासून देशात लॉकडाऊन करण्यात आले होते. अश्या परिस्थितीत गोरगरीबांवर उपासमारीची वेळ येवू नये म्हणून केंद्राने प्रधानमंत्री गरीब कल्याण योजना, अत्मनिर्भर योजनांतर्गत शिधापत्रिकाधारकांना प्रती व्यक्ती ५ किलो गहू, तांदूळ व १ किलो डाळ देण्यात आले होते. दरम्यान देशात व राज्यासह जिल्ह्यात कोरोनाची दुसरी लाट आली असून कोरोना पॉझिटीव्हची संख्या वाढत असून शासनाने पुन्हा मार्च २०२० पर्यंत धान्य वाटपची योजना लागू करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे.

 

निवेदनावर यांच्या आहे स्वाक्षऱ्या

या निवेदनावर रिपाईचे महानगराध्यक्ष अनिल अडकमोल, गोविंदा सोनवणे, प्रताप बनसोडे, मानव गायकवाउ, इश्वर पवार, शेखर सोनवणे, किशोर तायडे, किरण अडकमोल, शैलेश जाधव, बापू धामणे, विनोद साळवे, हरीष शिंदे, रोहित गायकवाड, भैय्या सपकाळे, शंकर आराक, ज्ञानेश्वर अहिरे, अक्षय बोदडे, अबु शेख गणी, बंटी साकळे, राहुल अहिरे, मोहन आढागे, राजू सोनवणे, सुनिल सपकाळे, प्रकाश चौधरी आदी पदाधिकाऱ्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.