शिंदाड येथील बेपत्ता तरुणाचा मृतदेह सापडला

0

पाचोरा (प्रतिनिधी) : शिंदाड ता. पाचोरा येथे ज्ञानेश्वर माधवराव सावळे वय – २५ रा. पहुरी ता. सोयगाव ह. मु. शिंदाड ता. पाचोरा याचा मृतदेह शेतातील विहिरीत आढळून आला आहे.

याबाबत माहिती अशी की, ज्ञानेश्वर माधवराव सावळे रा. पहुरी ता. सोयगाव हा शेती कामासाठी शिंदाड ता. पाचोरा येथे राहत होता. तो दि. २९  रोजी रात्री कुणास काही एख न सांगता घरातून निघून गेला होता. या बाबत पिंपळगाव (हरे.) पोलीस स्टेशनमध्ये दि. ३० रोजी हरविल्याची नोंद करण्यात आली होती. सदर शोधाशोध घेतला असता दि. ३१ रोजी दुपारी गहुले रस्त्यावरील शेतात त्याचा मृतदेह विहिरीत तरंगत्या अवस्थेत आढळून आला. याबाबत राजू रामदास पाटील यांनी पिंपळगाव (हरे.) पोलीस स्टेशनला दिलेल्या खबरी नुसार अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.