निलगायीच्या पिलाचा विहिरीत पडून मृत्यू

0

एरंडोल :  येथुन सुमारे दोन किलोमीटर लगतच्या वसंत चौधरी यांच्या शेतातील विहिरीत सुमारे अडीच महिने वयाचे नीलगायीचे पिलू विहिरीत पडून दगावल्याची घटना बुधवारी रात्री घडली. ३१ ऑक्टोबर गुरुवारी सकाळी शेतमालक यांचा मुलगा राकेश चौधरी यांच्या हा प्रकार लक्षात आला.त्यानंतर राकेश याने एरंडोल येथील वनक्षेत्राचे कार्यालय गाठले असता कार्यालय बंद आढळुन आले.म्हणुन त्याने त्यांचे मित्र प्रा.सुधीर शिरसाठ यांना त्याबाबत माहिती दिली.त्यांनी आपल्या भ्रमणध्वनिवरून वनक्षेत्रपाल बी.एस.पाटील यांचेशी संपर्क साधला असता त्यांनी फोन उचलला नाही.पुन्हा सुमारे दीड ते दोन तासांच्या अंतराने अकरा वाजता फोन केला असता त्यांनी फोन उचलल्यामुळे त्यांना सदर घटनेची माहिती देण्यात आली.

यावेळी घटनास्थळी वनरक्षक शिवाजी माळी,वनपाल सुनिल पाटील यांनी वन मजुरांच्या सहाय्याने निलागयीच्या पिलाला विहिरीच्या बाहेर काढले व त्याचे जागेवरच डॉ.संजय पाटील शवविच्छेदन करून शेताच्या बांधावर पिलाला पुरण्यात आले.विशेष म्हणजे यावेळी वनक्षेत्रपाल बी.एस.पाटील हे घटना स्थळी आलेच नाही असे त्यांच्या सहकार्याने सांगितले.

Leave A Reply

Your email address will not be published.