शाळा सुरू करण्याबाबत होणार लवकरच निर्णय,

0

लोकशाही न्यूज नेटवर्क 

 

मुंबई; शाळा सुरू करण्याबाबत लवकरच निर्णय. लसीकरणामुळे कोरोनाचा संसर्ग वाढला तरी हॉस्पीटलमध्ये दाखल होण्याचे प्रमाण कमी असल्याचे नमूद करत राज्यातील शाळा नेमक्या कधी सुरू होणार ? याबाबत आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज महत्वाचे विधान केले आहे.

कोरोनाच्या लसीकरणास आज एक वर्ष पूर्ण झाले आहे. या अनुषंगाने आज आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले की, राज्यात आपण ९० टक्के लोकांना पहिला डोस देण्यात आला आहे. दोन डोस ६२ टक्के लोकांना लस दिले आहे. १५ ते १८ वयोगटातील ४२ टक्के लसीकरण केले आहे. स्कुल कॉलेज बंद असल्यामुळे आता घरोघरी जावून लसीकरण करणार असल्याचं टोपे यांनी सांगितलं.

लसीकरणाचे महत्व खूप मोठे आहे,लसीकरणमुळे हॉस्पिटलमध्ये जाणार्‍यांची संख्या कमी आहे असल्याचे राजेश टोपे यांनी स्पष्ट केलंय. राज्यातील कोरोना बाधितांपैकी ८६ ते ८७ टक्के लोक होम क्वारंटाईन आहेत. त्यामुळे लसीकरण करणे महत्वाचं आहे. शाळेच्या बाबतीत मंत्रीमंडळात चर्चा झाली आहे. मुलांचे बाधीत होण्याच प्रमाण कमी आहे. शाळा सुरु करण्यासंदर्भात पालकांमध्ये दोन मतप्रवाह आहेत. मात्र पंधरा दिवसात शाळा सुरु करण्याबाबत निर्णय घेणार असल्याचं राजेश टोपे म्हणाले.

आरोग्यमंत्री पुढे म्हणाले की, आम्ही महिन्याचे हिशोब करुन ५० लाख कोविशिल्ड मागणी केली होती. केंद्र आम्हाला लस उपल्ब करुन देत नाही असे कधीच आम्ही बोललो नाही. तर, ज्या जिल्ह्यांमध्ये लसीकरण राज्याच्या सरासरीपेक्षा कमी असेल तिथं जिल्हाधिकारी, पालकमंत्री आणि विभागीय आयुक्तांना सूचना दिल्या असल्याची माहिती देखील आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.

Leave A Reply

Your email address will not be published.