शायर मुनव्वर राणा यांच्यावर गुन्हा दाखल

0

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क 

उत्तर प्रदेशातील शायर मुनव्वर राणा यांनी एका हिंदी वृत्त वाहिनीवर  अफगणिस्तान देशावरील सद्याच्या परिस्थीतीच्या मुद्यावरील मुलाखती दरम्यान शायर मुनव्वर राणा यांनी वादग्रस्त विधान केल्याने जळगाव येथील भाजपचे नगरसेवक  कैलास सोनवणे यांनी शनिपेठ पोलिस ठाण्यात शायर मुनव्वर राणा यांच्या विरुध्द गुन्हा दाखल केला आहे.

सद्या सर्वत्र चर्चेत असलेले अफगाणिस्तान देशावर तालिबान्यांनी विजय मिळवला  असून या मुद्यावरून उत्तर प्रदेशातील शायर मूनव्वर राणा यांची एका हिंदी वृत्त वाहिनीवर मुलाखत झाली. या मुलाखती दरम्यान त्यांनी वादग्रस्त विधान केल्याने सर्व माध्यमातून यावर टिका देखील झाली. त्यात आज या वादग्रस्त विधानाबाबत  जळगाव येथील भारतीय जनता पार्टीचे नगरसेवक कैलास सोनवणे यांनी जळगाव येथील शनिपेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.  मूनव्वर यांनी अनेक गझल प्रकाशित केल्या आहेत, त्यांची लेखनाची एक वेगळी शैली आहे. परंतू ऑक्टोबर २०२० मध्ये उत्तर प्रदेश पोलिसांनी राणा यांच्यावर धार्मिक गटांमधील शत्रुत्वाला प्रोत्साहन देण्यासाठी वक्तव्य केल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. तर आता अफगणिस्तान तालिबाने ताब्यात घेतल्याने त्याचे समर्थन करून तालिबानचे त्यांनी समर्थन एका हिंदी वृत्त वाहिनीच्या मुलाखतीला दिले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.