शहापूर येथील ना.आ.बोरसे विद्यालयाचा 100 टक्के निकाल

0

शहापूर ता.जामनेर (वार्ताहर) : शहापूर येथील ना.आ.बोरसे विद्यालयाचा निकाल 100 टक्के लागला असून   दरवर्षी प्रमाणे यशाची परंपरा विद्यालयाने कायम राखली आहे.

प्रथम क्रमांक कु.पूजा संजय कमळे या विद्यर्थीनीने मिळवला असून 90.20 टक्के मिळवून उत्तीर्ण झाली आहे.द्वितीय क्रमांक कु.रुपाली राजेंद्र भोई या विद्यार्थिनीचा असून तिला 89.20टक्के मिळाले आहे. तर तृतीय क्रमांक चि. राहुल आनंदा चौधरी याचा असून 85.20 टक्के मिळवून उत्तीर्ण झाला आहे.

विद्यार्थ्यांनी मिळवलेल्या या यशाबद्दल संस्थचे सचिव  प्रवीण मधुकर पाटील यांनी त्यांचे अभिनंदन केले. तर विद्यार्थ्यांना शाळेचे मुख्याध्यापक  उत्तम यशवंत भालेराव सर व शाळेचे सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचे मार्गदर्शन लाभले. तसेच गावकऱ्यांनी व शिक्षण प्रेमींनी या यशाबद्दल विद्यार्थी व विद्यालयाचे कौतुक केले.

Leave A Reply

Your email address will not be published.