शहरातील 3 दिवशीय जनता कर्फ्यूमुळे जिल्ह्यातील आगाराला 55 ते 60 लाखांचा फटका !

0

जळगाव :-शहरात सध्या कोरोनाने  थैमान घातलेल्या कोरोनाची धास्ती असल्याने जळगाव जिल्हाधिकारी, यांच्या आदेशाने जळगाव शहरात 11 मार्च रात्री 8 वा पासून  ते 15 मार्च सकाळी 8 पर्यँर तीन दिवस जनता कर्फ्यू मुळे  एसटीच्या प्रवाशी संख्येत लक्षणीय घट झाली असून तीन दिवस पर्यंत प्रतिदिन 900 फेऱ्या जिल्ह्यात अवघ्या 3 दिवसात 55 ते 60 लाख रुपयांनी उत्पन्न कमी झाले आहे.

कोट्यवधीचे उत्पन्न महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाला प्राप्त होत असतात. मात्र सध्या जगभरात थैमान घातलेल्या कोरोनाची धास्ती लोकांनी घेतल्याने, एसटीच्या प्रवाशी संख्येत लक्षणीय घट झाली असून, गत वर्षीच्या तुलनेत यावर्षी, कमी झाले आहे.

आजपासून बससेवा सुरळीत प्रवाशांनी घाबरू नये, सुरक्षितता बाळगावी ‘एसटी’चा प्रवास खासगी वाहनांपेक्षा किती तरी पटीने सुरक्षित आहे. प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ सदैव तत्पर असते. त्यामुळे सध्याही प्रवाशांना संसर्गजन्य आजाराची लागण होऊ नये, यासाठी आवश्यक त्या खबरदाऱ्या घेतल्या जात आहेत. लवकरच एसटीच्या वाहकांजवळ सॅनिटायझर्स दिले जाणार आहेत. संसर्ग टाळण्यासाठी आवश्यक सूचना ‘अनाऊंसमेन्ट’द्वारे दिल्या जात आहेत. त्यामुळे प्रवाशांनी घाबरू नये, सुरक्षितता बाळगावी.

श्री दिलीप बांजारा, विभागीय वाहतूक अधिकारी,जळगाव

Leave A Reply

Your email address will not be published.