18 वर्षावरील सर्व नागरिकांना कोरोना लस द्यावी

0

खामगांव:-(प्रतिनिधी) राज्यात कोरोना लसीकरणाची मोहिम सुरु करण्यात आली आहे.परंतू या लसीकरणाचा वेग मंदावल्यामुळे नागरिकांना लसीकरणासाठी वाट बघावी लागत आहे. जेवढया जास्त प्रमाणात लसीकरण होईल तेवढया नागरिकांची प्रतिकार शक्ती वाढीस लागेल. त्यामुळे शासनाला कोरोना रोखण्यासाठी सक्तीच्या उपाययोजना कराव्या लागणार नाही. म्हणून राज्य षासनाने वयाची 18 वर्षा पुर्ण केलेल्या सर्व नागरीकांसाठी गतीषीलतेने लसीकरण मोहिम सुरु करावी अशी मागणी माजी आमदार राणा दिलीपकुमार सानंदा यांनी राज्याचे मुख्यमंत्री उध्दवजी ठाकरे,आरोग्यमंत्री ना.राजेश टोपे, बुलडाणा जिल्हयाचे पालकमंत्री ना.डाॅ.राजेंद्रजी शिगंणे व बुलडाणा जिल्हयाचे जिल्हाधिकारी एस.रामामुर्ती यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

सानंदांनी दिलेल्या निवेदनात नमदू आहे की,सद्यपरिस्थितीत राज्यात लसीकरणाचा मंदावलेला वेग पाहता सर्व खाजगी रुग्णालयाच्या डाॅक्टरांमार्फत सुध्दा नागरिकांना कोरोना लस देणे बंधनकारक करावे. राज्यातील लोकसंख्येचा आकार पाहता बसस्थानकावर तसेच सेवाभावी संस्थेंच्या मार्फत वार्डा-वार्डात,गावा-गावात शिबीरे लावुन लसीकरणासाठी नाव नोंदणीची सुलभ पध्दत राबवावी. लस घेणा-या नागरिकांना त्रास होणार नाही,त्यांना रुग्णालयाच्या गर्दीत जावुन लसीकरणासाठी वाट बघावी लागणार नाही याकरिता साधे आधार ओळखपत्र दाखवा व लस घेउन जा अशी सोपी मोहिम राबवावी. लसीकरण अधिक प्रभावी होण्यासाठी कोठेही लस उपलब्ध करुन देण्याची व्यवस्था तातडीने निर्माण करणे हाच टाळेबंदीवरील ठोस उपाय असु शकतो. कोरोना काळात काही मेडिकल स्टोअर्सवर  कोरोनावरील लस व औषधी अव्वाच्या सव्वा दराने विकुन  रुग्णांची आर्थिक लूट केली जात आहे. म्हणून शासनाने याची गांभीर्यांने दखल घेउन प्रत्येक मेडिकलवर कोरोना लसींचे  व औषधींचे दरपत्रक ठळक अक्षरात लावण्याच्या सुचना  सर्व मेडिकल दुकानदारांना देण्यात याव्या तसेच नागरिकांनी मेडिकलवरुन कोरोना लस किंवा औषधी घेतल्यास त्यांनी त्याचे मेडिकलवरुन पक्के  बिल घेणे बंधनकारक करण्यात यावे. जो कोणी औषध विक्रेता जास्त दराने कोरोनाची लस विकत असेल त्याच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात यावी अशी मागणी सानंदांनी शासनाकडे केली आहे.

कोरोनामुळे मागील एक वर्षापासून लावण्यात येत असलेल्या लाॅकडाऊन व संचारबंदीमुळे सर्वसामान्यांचे अर्थचक्र बिघडले असून गरीब वर्ग नाहक भरडल्या जात आहे.हातावर पोट भरणाया मजूर,कामगार वर्ग सोबतच शेतकरी, कामगारांचे सुध्दा लाॅकडाऊनमुळे मोठे हाल होत आहे. कोरोना विशाणूचा प्रार्दुभाव वाढु नये यासाठी लाॅकडाउन किंवा संचारबंदी लावणे हा उपाय नसून कोरोनाला न घाबरता त्याचेशी लढायला शिका व शासनाने दिलेल्या त्रिसुत्रींचे पालन करा. कोरोनाबाबत प्रत्येकाने स्वतः आणि कुटुंबासाठी कोरोना नियमांचे पालन करावे.जर शासनाने दिलेल्या नियमांचे पालन केल्या गेले नाही तर  रुग्णांची वाढलेली संख्या लक्षात घेता शासनावर नाईलाजाने लाॅकडाउन किंवा संचारबंदी लावण्याची वेळ येत आहे. ‘माझे कुटुंब-माझी जबाबदारी’या ब्रिद वाक्याप्रमाणे सर्वांनी काटेकोरपणे षिस्त पाळण्याचा संकल्प घ्यावा व अत्यावश्यक काम असेल तरच घराबाहेर पडावे अशी कडकडीची विनंती सुध्दा सानंदांनी नागरिकांना केली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.