शहरातील रत्यांच्या दुर्दैवी अवस्थेमुळे रेल्वे कामगारांच्या समस्यात वाढ ; पाठदुखी सह माणेच्या आजारात वाढ

0

पालकमंत्री गुलाबराव पाटील यांची  घेतली भेट

भुसावळ (प्रतिनिधी )- 

यावल नाका-गांधी पुतळा झेड आरटीआई रस्त्यांची बिकट समस्या सोडविण्या साठी येथील रेलकामगार सेनेसह विविध यूनियन प्रतिनिधींनी घेतली ना. ग़ुलाबराव पाटिल यांची नुकतीच भेट घेवून त्यांना या रस्त्यामुळे होणारा त्रास व अडचणी बाबत सविस्तर माहिती दीली व रस्ता लवकरात लवकर दुरुस्त करावा  अशी मागणी निवेदनाद्वारे  केली.

यावेळी  नेमकी हीं जबाबदारी कोणाची  रेल्वे प्रशासन की नगरपालिका याबद्दल जिल्हाधिकारी यांचे कडून हा रस्त्या नेमका कोणाच्या मालकीचा आहे हे  लिखित स्वरूपात आणावे त्यानंतर योग्य निर्णय लवकरच घेण्यात येईल असे आश्वासन ना पाटिल यांनी दिले .

या रस्त्याने जवळपास ७००० कर्मचारी यांचा  वापर असून अतिशय खराब व दयनीय रस्त्यामुळे, बहुतेक कर्मचारी यांना पाठीचा त्रास झाला आहे मात्र  रेल्वे अधिकारी यांना कामगारांच्या तब्बेतीचे काही घेणे देणे नाही,त्यांना फक्त काम हवे असते, रेल्वे अधिकारी यांच्या बंगल्याचे डांबरीकरण नियमित होते मग त्या बंगल्याचे डांबरीकरण चांगले असो की खराब आता रेल्वे चे महाप्रबंधक  पीओएच झेड आरटीआई च्या निरीक्षण दौऱ्यावर येत आहेत यावेळी  ते रोड दुरुस्त करतील तेव्हा  ते बघनार नाहीत की रोड रेल्वे चा आहे की नगरपालिकाचा हा त्रास फक्त कामगार व नागरिकांना होत आहे . यात एमओएच मधील  4-6 कर्मचारी यांना रस्त्यामुळे झालेल्या त्रासामुळे पाठीच्या आणि मानेच्या आजाराने  हॉस्पिटललाअँडमीट आहे  तर बरेचशे ट्रीटमेंट घेत आहे. काहीजण भायखला रेल्वे हॉस्पिटल मध्ये अँडमीट आहेत.

एमओएच ,पीओएच, सी अँड डब्ल्यू , आईओडब्ल्यू, डीसीओएस , झेड आरटीआई, ,मधील अनेक  कर्मचारि यांनी  विविध यूनियन पदाधिकारी यांना विनंती केली की रेल्वे प्रशासन रोड कड़े लक्ष देत नाही तरी तुम्ही सर्व युनियन मिळून काहीही करा पण रोड दुरुस्त करा.

म्हणून आम्ही सर्वानी पालकमंत्री ना . ग़ुलाबराव पाटिल यांची भेट घेवून हा प्रश्न मार्गी लावण्याचे निश्चित केले.व पालकमंत्री यांची तातडीने भेट घेतली . कामगारानी आपल्या वेदना व्यथा सांगताना अक्षरशा: अंगावरील शर्ट काढून सत्य परिस्थिती दाखवली .

यावेळी रेल कामगार सेनेचे ललितकुमार मुथा,प्रीतम टाक ,सजंय चौधरी ,  रूपसिंग पाटिल,ललित भारंबे ,राजकुमार गवली,एससीएसटी असोसिएशन चे विशाल सपकाळे, समाधान हिवाळे ,ओबीसी असोसिएशनचे महेश राणे व इतर पदाधिकारी हजर होते

Leave A Reply

Your email address will not be published.