शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राहणार:-आ. अनिल पाटील

0

शहरात पोलीस चौकीचे उदघाटन
अमळनेर : पोलीस स्टेशन शहराबाहेर तीन ते चार किमी अंतरावर असल्याने रात्रीच्या वेळी वृद्ध , महिला आदींना तक्रार करण्यासाठी व शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी तहसील कार्यालयाबाहेर अमळनेर शहर पोलीस चौकी सुरू करण्यात आली असल्याची माहिती आ. अनिल पाटील यांनी उद्घाटन प्रसंगी दिली .
काही दिवसांपूर्वी गृहमंत्री अनिल देशमुख व आय.जी. प्रतापराव दिघावकर अमळनेर येथे पोलीस वसाहतीच्या उद्घाटनसाठी अमळनेरला आले होते . त्यावेळी पोलीस स्टेशन लांब पडते व रात्रीच्या वेळी खूप अडचणी येतात अशा नागरिकांच्या समस्या आमदार अनिल पाटील यांनी मांडल्या होत्या. त्यावेळी नागरिकांच्या तक्रारी शहरातच घेण्याची व्यवस्था करण्याचे आदेश गृहमंत्री व आय जी नी दिले होते त्यानुसार तहसील कार्यालयाजवळ शहर चौकी उभारण्यात आली असून सायंकाळी ७ ते सकाळी ६ पर्यंत याठिकाणी तक्रारी नोंदविण्यात येणार आहेत .
यावेळी प्रमुख अतिथी माजी आमदार साहेबराव पाटील यांनी नवीन पोलीस स्टेशनचा अडकलेला प्रस्ताव बाहेर काढून त्याची अंमलबजावणी होण्याची अपेक्षा व्यक्त केली , डी वाय एस पी राकेश जाधव यांनी कमी संख्याबळात आहे त्या परिस्थितीत जनतेला न्याय देण्याचा प्रयत्न करीत असल्याचे सांगितले , शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख डॉ राजेंद्र पिंगळे , पत्रकार संजय पाटील यांनी मनोगत व्यक्त केले पोलीस निरीक्षक अंबादास मोरे यांनी प्रास्ताविक केले प्रमुख अतिथी म्हणून माजी आमदार स्मिता वाघ , तालुका काँग्रेस अध्यक्ष गोकुळ पाटील , तहसीलदार मिलिंद वाघ ,जयवंतराव पाटील , शिवसेनेचे तालुका प्रमुख विजय पाटील , युवा जिल्हा सेनेचे उपप्रमुख श्रीकांत पाटील , नगरसेवक संजय पाटील , ए पी आय प्रकाश सदगीर , डॉ रवींद्र पाटील ,विक्रांत पाटील ,भाजप चे माजी शहराध्यक्ष शीतल देशमुख, राजू फापोरेकर हजर होते सूत्रसंचालन व आभार पोलीस नाईक डॉ शरद पाटील यांनी मानले कार्यक्रम यशस्वीतेसाठी हेडकॉन्स्टेबल दीपक विसावे , योगेश महाजन ,रवी पाटील , दीपक माळी यांचे सहकार्य लाभले.

Leave A Reply

Your email address will not be published.