शकुंतला विद्यालयात सावित्रीबाई फुले जयंती उत्साहात साजरी…

0

जळगांव – शिक्षणापासून वंचित असलेल्या स्त्रियांसाठी समाजात शिक्षणाची ज्योत पेटवणाऱ्या व भारतीय स्त्री शिक्षणाची जननी,क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती शकुंतला जे प्राथमिक विद्यालयात उत्साहात साजरी करण्यात आली.

सावित्रीबाई फुले यांची वेशभूषा केलेल्या विद्यार्थीनीच्या हस्ते पूजन करून माल्यार्पण करण्यात आले. या वेळी सर्व विद्यार्थीनी संघणक व टॅबलेट चालवून आधुनिक युगाची सावित्रीबाई फुले असे दर्शन घडले.

शाळेतील शिक्षक राहुल चौधरी यांनी सावित्रीबाई फुले यांचा कार्या विषयी माहिती दिली.विद्यार्थ्यांनी मनोगतात सावित्रीबाई फुले च्या कार्याला उजाळा दिला. कार्यक्रमात शाळेच्या मुख्याध्यापिका नेहा जगले,स्वाती जगले, लक्ष्मी भालेराव आदी शिक्षकांनी अभिवादन केले.

Leave A Reply

Your email address will not be published.