बोदवड येथे बॅरिस्टर वीरभाई कोतवाल यांची पुण्यतिथी साजरी

0

बोदवड – शहरात नाभिक समाज महामंडळातर्फे हुतात्मा वीरभाई कोतवाल यांची पुण्यतिथी साजरी करण्यात आली.यावेळी त्यांच्या प्रतिमेस संजय वाघ सर यांच्या हस्ते पुष्पहार करण्यात आले.यावेळी नाभिक समाज बोदवड तालुकाध्यक्ष विवेक वखरे यांनी बॅरिस्टर वीरभाई कोतवाल यांच्या जीवनाविषयी माहिती दिली. गणेश सोनोने यांनी आपले मनोगत व्यक्त केले.

या प्रसंगी तालुकाअध्यक्ष विवेक वखरे,संस्थाअध्यक्ष संजय वाघ,उपाध्यक्ष गोपाळ बोरसे,राजेंद्र शेळके,सचिव गणेश सोनोने,सहसचिव श्रीनिवास बाभुळकर,शहराध्यक्ष प्रकाश बाभुळकर,योगेश वखरे,सोपान महाले,राजेंद्र बिडके,किशोर डापसे,नाना डापसे,व सर्व नाभिक समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.