वेडसर महिलेच्या करामतीने लोहारेकर थक्क

0

लोहारा ता.पाचोरा, ज्ञानेश्वर राजपुत,  लोकशाही न्यूज नेटवर्क 

लोहारा येथे कुणीही आले तर त्याचे उपासमार होणार नाही, या समीकरनाची आतापर्यंत परंपरा जुडली आहे.  संतांची भूमी ‘जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो  आपुले’  याप्रमाणे लोहारावासीयांची वाटचाल सुरू आहे.  तीच पिढी जोपासते यांचे आतापर्यंतची वाटचाल सुरूआहे.  तिला अजूनही तडा गेलेला नाही हे ठामपणे सांगता येते कुणीही वाटसरू आलं तर  त्याला प्रेमानं मार्गस्थ करावं प्राधान्याने गावात राजकारण असलं तरी ते तात्विक समजाव कुणी टारगटपणा करत असेल तर त्याला समजून घेण्याची ही मानसिकता काही लोक अजून पुढे घेतात.

मानवी जीवनात कोणाला काही व्याधी कोणत्या वेळेस जुळेल हे कुणीही सांगू शकला नाही.  त्यात आजार-तिजार म्हणावा आजार बरा होईल याची शास्वती नाही, कोणाची मानसिकता बिघडेल; मानसिकता बिघडल्यानंतर त्याला वेडं संबोधल जात. वेडं झाल्यानंतर त्याचं सर्व बाबींवरून महिला/पुरुष संतुलन बिघडतं असं संतुलन सुटलेली महिला जवळपास पन्नास ते साठ वर्ष वयोगटात असावी.  आठ ते दहा दिवसापासून लोहारा येथे आलेली आहे.  या महिलेच्या वेगवेगळ्या करामती पाहून लोहारेकर असो किंवा रस्त्याने बाहेर गावाहून येणारा जाणारा जातो त्या करामती पाहून थक्क झाल्याविना राहणार नाही.

प्राथमिक भाषेवरून अंदाज केला असता ही महिला नेपाळी असावी, वेडसर कपडे मरगळटलेला पेहराव समोरून आली गेली तर कुणीही वेडी महिला आली असंच म्हणणार व तिची शाब्दिक भाषा जी आपल्या प्रांतातली नसल्याने कोणालाही समजत नाही किंवा ती संतुलनाअभावी बोलत असेल कुठे तिच्या वेडात गाणं गुनगुनाते तर कधी विचित्र हावभाव करते.  स्वतःहून माधुकरी(भिक) कुणालाही मागत नाही कुठे थांबली तर आपण आपण नित्य भिकारी किंवा वेळा आला तर त्याला भिक्षा द्यावी ही आपली संस्कृती सांगते त्याप्रमाणे देतो ती स्वीकार करते अशीही आठ ते दहा दिवसापासून दाखल झालेली वेडसर महिला  म्हणावी.

वेडात दिवसभर तिच्या चक्रव्यूहात किंवा वेड्याचं सोंग घेऊन ती सैरभैर गावभर फिरते असा ही प्राथमिक अंदाज आहे.  तिच्यावर उपचाराची गरज दिसते.  दिवसभर कोठेही भाजीपाला वर्गीय किंवा भाजीपाला वर्गीय फळ दिसेल ते आपल्या झोळीत जमा करते,  तांदूळ आणते, बसस्थानक चौफुलीवर टुरिंग टॉकीज समोर येऊन कचरा-कुचरा जमा करून दगडांची चूल बनवून पेटवते. ते जमा केलेलं सर्व भाजीपाला तिला सापडलेल्या मातीच्या माठाच्या खापरात टाकते व सामान्य गृहिणी प्रमाणे बनवायला सुरुवात करते.  ते आपण सर्व मिक्स भाजी म्हणजे आयुर्वेदिक भाजी अशी संकल्पना आहे.  ती बनवून शिजवून सर्व खाऊन पिऊन टाकते तिला काही वाटलं की आपल्याला मदतही ती पाहणाऱ्यांना सांगते पण तिचीही बनवण्याची पद्धत गलिच्छ असल्याने तिच्या सांगण्याकडे सर्वच पाहणारे दुर्लक्ष करून हसण्यावरती नेतात व अवाक् होतात मात्र तिच्या या करामती पाहून पाहणारे थक्क होत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.