वृध्दाची गोठ्यात गळफास घेऊन आत्मह्त्या

0

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क 

जळगाव शहरातील तांबापूरा येथे वृध्दाने गोठ्यात गळफास घेऊन आत्मह्त्या केल्याची घटना उघडकीस आली आहे.

शहरातील तांबापुरा भागातील गुरांच्या गोठ्यात आज एका वृद्धाने  गळफास घेतल्याचे आज पहाटे उघडकीस आले. मयताचे नाव अशोक कौतीक हटकर (वय ६५) असून आज सकाळी त्यांचा मुलगा दुध काढण्यासाठी गोठ्यात गेला असता तेव्हा हा प्रकार त्याच्या लक्षात आला . अशोक हटकर यांनी नेमकी कशामुळे आत्महत्या केली,  याची माहिती अद्याप मिळू शकली नाही. त्यांच्या पश्‍चात पत्नी, दोन मुले, मुलगी असा परिवार आहे. याप्रकरणी  एमआयडीसी पोलीस स्थानकात मृत्यूची नोंद करण्याचे काम सुरू आहे.

 

Leave A Reply

Your email address will not be published.