विश्वास नांगरे पाटील यांची नाशिक पोलिस आयुक्तपदी बदली

0

नाशिक :- नाशिक पोलीस आयुक्तपदी विश्वास नांगरे पाटील यांची बदली झाली आहे. रवींद्र सिंघल यांच्या जागी बदली झाली असून, लवकरच ते पदभार स्विकारणार आहेत.

रवींद्र सिंघल यांच्या नियुक्तीबद्दल मात्र अद्याप कोणती माहिती मिळालेली नाही. रवींद्र सिंघल आणि विश्वास नांगरे पाटील दोघेही धडाडीचे आयपीएस अधिकारी म्हणून ओळखले जातात. दरम्यान कोल्हापूर परिक्षेत्र महानिरीक्षकपदी असणाऱ्या विश्वास नांगरे पाटील यांची बदली झाल्याने त्यांच्या जागी प्रकाश मुत्याल यांची नियुक्ती होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

महाराष्ट्रातील स्पर्धा परिक्षेसाठी तयारी करणारे अनेक तरुण विश्वास नांगरे पाटील यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवतात. विश्वास नांगरे पाटील हे मूळचे सांगली जिल्ह्यातील आहेत. स्पर्धा परिक्षेसाठी अनेक तरुणांना ते मदतदेखील करतात.

विश्वास नांगरे पाटील यांनी भूषवली पदं ?

लातूर जिल्हा पोलीस अधीक्षक
अहमदनगर जिल्हा पोलीस अधीक्षक
पुणे जिल्हा ग्रामीण पोलीस अधीक्षक
मुंबई पोलीसदल उपायुक्त
ठाणे जिल्हा ग्रामीण पोलीस अधीक्षक
अप्पर(अतिरिक्त -) पोलीस आयुक्त, मुंबई पश्चिम विभाग
पोलिस महानिरीक्षक, कोल्हापूर परिक्षेत्र

Leave A Reply

Your email address will not be published.