यावलला बारावी परीक्षेत कॉपी पुरविणाऱ्यांची भरली जत्रा

0

यावल :- माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत घेण्यात येणाऱ्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षा इयत्ता बारावीची परीक्षा 21 फेब्रुवारी पासून सुरू झाली. यात यावल येथील डॉ.झाकीर हुसेन उर्दू हायस्कूल येथील परीक्षाकेंद्रावर कॉपी पुरविणाऱ्यांची जत्रा भरल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. ही जत्रा बघितली असता तसेच थेट परीक्षार्थी विद्यार्थ्यांपर्यंत कॉपी पोचविणारी यंत्रणा सक्रिय असल्याने शैक्षणिक गुणवत्तेबाबत अनेक प्रश्न उपस्थित होत आहे.

यावल येथील परीक्षा केंद्र क्रमांक 810 ची बैठक व्यवस्था डॉक्टर झाकीर हुसेन उर्दू हायस्कूल व कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात करण्यात आली आहे. परीक्षेसाठी बैठक व्यवस्था व इतर माहिती सुद्धा केंद्र संचालक प्राध्यापक संजय पाटील व कला-वाणिज्य महाविद्यालयाचे सर्वेसर्वा प्राध्यापक पाटील, उपप्राचार्य यांनी नेहमीप्रमाणे आपल्या खास प्रतिनिधींना देऊन गोपनीयता बाळगली पहिल्याच दिवशी डॉक्टर झाकीर हुसेन उर्दू हायस्कूलच्या आजूबाजूस व परीक्षा केंद्र आवारात कॉपी पुरविणार यांची मोठी जत्रा भरली. प्रत्येक पेपरच्या दिवशी कॉपी पुरवणाऱ्या यत्रणेत संस्था चालकांचे काही खास प्रतिनिधी, संचालक, काही आजी-माजी नगरसेवक, काही पुढारी, कार्यकर्ते सहभागी असल्याने परीक्षार्थी विद्यार्थ्यांचे पालक मित्रमंडळी गोतावळा सुद्धा या संधीचा पुरेपूर फायदा घेत आहे.

डॉक्टर झाकीर हुसेन उर्दू हायस्कूल मध्ये पहिल्या दिवशी यावल पंचायत समितीचे कृषी अधिकारी डी पी कोते व त्यांच्या सहकाऱ्यांचे खास बैठे पथक सकाळी 11 वाजेपासून ठाण मांडून होते परंतु परीक्षा केंद्रातील राजकीय-सामाजिक प्रभावामुळे बैठकी पथक हतबल होऊन निष्क्रिय ठरले असल्याचे परीक्षा केंद्रातील व बाहेरील कॉपी पुरविणाऱ्या यंत्रणेच्या छायाचित्रणावरून लक्षात येते, या यंत्रणेत केंद्रसंचालक, सुपरवायझर भरारी पथक, बैठे पथक, पोलिस, महसुल कर्मचारी, गटशिक्षणाधिकारी यांच्यासह राजकीय, सामाजिक काही पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा समन्वय सुद्धा दिसून आला.

झेरोस दुकानावर गर्दी ?

शहरात एकूण दहा ते पंधरा झेरॉक्स दुकाने आहेत परीक्षा वेळेत कोणालाही प्रश्नपत्रिकेची प्रश्नाची उत्तरे लिखाण केलेल्या उत्तराची, कॉपीची कोणालाही झेरॉक्स काढून देऊ नये अशा सक्त सूचना असताना कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय व डॉक्टर झाकीर हुसेन विद्यालयाच्या रस्त्यावर मधोमध असलेल्या एका झेरॉक्स दुकानावर ग्राहकांची मोठी गर्दी असल्याने या झेरॉक्स दुकानदाराला नेमका कोणत्या विद्यालयाचा मोठा आश्रय आहे या दुकानावरच ग्राहकांची एवढी मोठी गर्दी का होत असते हा मोठा संशोधनाचा व चौकशीचा विषय असला तरी जिल्हाधिकारी जळगाव, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी जळगाव, जिल्हा पोलीस अधीक्षक जळगाव यांनी संयुक्त मोहीम राबवून कॉपी पुरविणाऱ्यांचा बंदोबस्त करावा, अशी सर्व स्तरातून मागणी होत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.