विश्वातील भूमी मातेच्या एकमेव मूर्तीची अमळनेरला स्थापना

0

अमळनेर (प्रतिनिधी) : येथील मंगळ ग्रह सेवा संचलित श्री मंगळदेव ग्रह मंदिरात विश्वातील भूमिमातेच्या एकमेव मूर्तीसह श्री पंचमुखी मारुती व श्री मंगळदेव ग्रहाच्या पंचधातूच्या उत्सव मूर्तीची संतश्री प्रसाद महाराज यांच्या हस्ते विधिवत प्राणप्रतिष्ठा झाली. माजी आमदार कृषीभूषण साहेबराव पाटील यांनी या कार्यक्रमास भरीव अर्थसहाय्य केले.

तीन दिवस चाललेल्या या महासोहळ्याचे मुख्य यजमान मंगळग्रह सेवा संस्थेचे अध्यक्ष डिगंबर महाले व सौ. आशा महाले होते. विविध क्षेत्रातील अनेक मान्यवर  या विविध पूजा विधींमध्ये सपत्नीक सहभागी झाले होते.

श्री भूमिमाता व श्री पंचमुखी मारुती च्या प्रत्येकी साडेतीन फुटी मूर्ती काळया पाषाणातील आहेत. कर्नाटकातील गदग येथील घरंदाज व निष्णात मूर्तिकारांनी अत्यंत वैशिष्ट्यपूर्णरित्या दाक्षिणात्य शैलीत या मुर्त्या घडविल्या आहेत. त्यासाठी त्यांना तीन महिन्यांहून अधिक कालावधी लागला.

धुळे येथील अप्पर जिल्हा पोलीस अधीक्षक प्रशांत बच्छाव, धुळे येथील निवासी उपजिल्हाधिकारी संजय गायकवाड, निवृत्त पोलिस उपअधीक्षक शामकांत सोमवंशी, तहसीलदार सुदाम महाजन व मिलिंद वाघ, जळगाव येथील आर. सी. बाफना ज्वेलर्सचे संचालक अभिषेक बाफना, पोलीस निरीक्षक अंबादास मोरे ,खारघरचे पोलीस निरीक्षक शत्रुघ्न माळी ,नाशिक येथील विक्रीकर उपायुक्त विजय पवार, ज्येष्ठ नेत्या ॲड. ललिता पाटील, महिला काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षा सुलोचना वाघ, धुळे येथील ज्येष्ठ वकील देवेंद्र कुमार शिरोडे,  ॲड. प्रदीप भट ,संत सखाराम महाराज संस्थानचे विश्वस्त दिलीप (राजू) नेरकर( नाशिक) छडवेल कोरडे (तालुका साक्री) येथील माजी सरपंच रत्नाकर पाटील, मॅनेजमेण्ट एक्सपर्ट वेदांशू पाटील (नाशिक) पाटबंधारे विभागाचे निलेशराव तराठे (जळगाव),  सहाय्यक प्राध्यापक अतुल साबे( चोपडा ), बिल्डर श्यामशेठ गोकलानी ,प्रसन्न पारख व भरत सैनदाने ,  कॉन्ट्रॅक्टर शशिकांत पाटील (पाचोरा) , मुख्याध्यापक पी. एल. मेखा,  सार्वजनिक बांधकाम विभागाचे अमोल पाटील (मालेगाव ,माजी मुख्याध्यापक राजेंद्र निकुंभ, शिक्षक तथा पत्रकार विनोद कदम व उमाकांत हिरे, दैनिक लोकमतच्या जाहिरात विभागाचे रवींद्र बोरसे, लायन्स क्लबचे ज्येष्ठ सदस्य दिलीप गांधी व मनिष जोशी, रोटरी क्लबचे सदस्य विशाल शर्मा व आशिष चौधरी हे मान्यवर तीन सत्रात झालेल्या हवनात्मक पूजा  – विधीत सपत्नीक सहभागी झाले होते.

तीन दिवसात राजकीय, सामाजिक ,धार्मिक ,शैक्षणिक व सांस्कृतिक क्षेत्रातील तसेच विविध विभागाचे अधिकारी व कर्मचारी यांनी मोठ्या संख्येने भेट दिली .त्यांना शक्य तितक्या वेळ ते पूजेतही सहभागी झाले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मंगळग्रह सेवा संस्थेचे अध्यक्ष डिगंबर महाले ,उपाध्यक्ष एस. एन. पाटील, सचिव एस. बी. बाविस्कर, सहसचिव दिलीप बहिरम, खजिनदार गिरीश कुलकर्णी, विश्वस्त अनिल अहिरराव व जयश्री साबे  तसेच अनेक सेवेकर्‍यांनी परिश्रम घेतले.

ख्यातनाम पुरोहित केशव पुराणिक मुख्य पुरोहित होते. तर प्रसाद भंडारी, तुषार दीक्षित, जयेंद्र वैद्य ,गणेश जोशी ,यतीन जोशी ,अथर्व कुलकर्णी ,सारंग पाठक ,निलेश असोदेकर, अंबरीष कळवे ,शुभम वैष्णव, सुनील मांडे, मयुर जोशी (नेवासा) परशुराम जोशी (नाशिक) सागर कुलकर्णी व प्रदीप जोशी (अहमदनगर) सहाय्यक पुरोहित होते.

भूमियागासाठी अमळनेर ठरणार अद्वितीय 

साधारणत: ज्यांना रेती, शेती, माती, जमीन -जुमला, घरा – दाराच्या समस्या असतात अशी मंडळी म्हणजेच शेतकरी, सिव्हिल इंजिनिअर, आर्किटेक्ट, बिल्डर, डेव्हलपर्स, दलाल आदी या समस्यांच्या निवारणार्थ किंवा वरील क्षेत्रात उत्तम व्यावसायिक यशासाठी  भुमियाग करतात. या सर्व बाबींचे मूळ भूमि आहे. अमळनेरच्या श्री मंगळदेव ग्रह मंदिरात पूर्वीपासून भूमिपुत्र श्री मंगळग्रहाची मुर्ती होतीच. आता भूमिमातेची मूर्ती स्थापित झाली आहे .या दोन्ही देवतांच्या मूर्तींच्या साक्षीने होणारा भुमियाग आता विशेष अलौकिक व प्रभावी होईल अशी भाविकांमध्ये श्रद्धा आहे. या दोन्ही देवतांच्या मूर्ती एकाच ठिकाणी विश्वात कुठेही नाहीत. त्यामुळेच आता अमळनेरचे श्री मंगळदेव ग्रह मंदिर विश्वात भोमयागासह अन्यही पूजा – विधी तथा अभिषेकासाठी अद्वितीय ठरणार आहे . परिणामी धार्मिक क्षेत्रात अमळनेरचे नाव वैश्विक पातळीवर ठळकपणे अधोरेखित होईल.

Leave A Reply

Your email address will not be published.