पारोळा येथे कोविड-१९ लसीकरणाला सुरूवात

0

पारोळा (प्रतिनिधी) : आज पारोळा कुटीर रूग्णालय येथे आमदार मा.आबासाहेब चिमणरावजी पाटील यांच्या हस्ते कोविड-१९ च्या लसिकरणाचे व लसीकरण कक्षाचे उदघाटन करण्यात आले.

यावेळी पारोळा कुटीर रूग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डाॕ.योगेश साळुंखे यांना प्रथम लस देऊन  लसीकरण करण्यात आले. यावेळी प्रांताधिकारी विनय गोसावी, तहसिलदार अनिल गवांदे, गटविकास अधिकारी एन.आर.पाटील, पोलीस निरीक्षक लिलाधर कानडे,वैद्यकिय अधिकारी प्रांजली पाटील, पारोळा शिवसेना शहरप्रमुख अशोकभाऊ मराठे, जि.प. सदस्य रोहन पाटील, पं.स. उपसभापती अशोक पाटील,डाॕ.गिरीष जोशी, पंकज मराठे, राजु पाटील, छोटु चौधरी तसेच पत्रकार व कुटीर रूग्णालय पारोळा येथील कर्मचारी उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.