विवाहित महिलेची गळफास घेऊन आत्महत्या..पतीसह सासु सासरे ताब्यात

0

जळगांव (प्रतिनिधी) – शहरातील प्रजापत नगर परिसरातील माहेर असलेल्या वीस वर्षीय विवाहित महिला सासरी राधाकृष्णन नगर राहत्या घरी गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना घडली असता .मात्र हा घातपाताचा प्रकार असल्याचे विवाहितेच्या पित्याने चारित्र्याच्या संशयावरून पतीने तिचा घातपात केल्याचा संशय व्यक्त केल्याने आणि सासरच्या मंडळींना अटक झाल्याशिवाय मृतदेह ताब्यात न घेण्याचा पवित्रा घेतल्याने पती शेखर गायकवाड सासू सासरे व जेठ यांना गुन्हा दाखल करुन आदींना पोलिसांनी संशयावरून ताब्यात घेतले आहे.

प्रजापत नगरात राहणाऱ्या दुर्गा या तरुणीचा विवाह मागील वर्षी २३ डिसेंबर रोजी राधाकृष्ण नगरात राहणाऱ्या शेखर गायकवाड या तरुणाशी झाला होता. लग्नाच्या महिनाभरानंतर सासरच्या मंडळींनी तिला त्रास देण्यास सुरुवात केली. चारित्र्याच्या संशयावरून पती-पत्नीमध्ये वारंवार खटके उडत होते. शुक्रवारी दुपारी 3 वाजेच्या सुमारास दुर्गा गायकवाड या विवाहित महिलेने जळगाव शहरातील दुध फैडरेशन जवळ राधाकृष्णन नगर सासरी येथे गळफास घेऊन आत्महत्या केली. शेखर गायकवाड यांचे खान्देशी व्हेज नावाचे हॉटेल असून पती-पत्नी दुपारी आरामासाठी घरी येतात. घटना त्याच वेळी घडली असून पतीने तिचा घातपात केल्याचा संशय तिचे वडील दत्तू आधार पाटील यांनी व्यक्त केला आहे. दरम्यान, जोपर्यंत आरोपींना अटक केली जात नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नसल्याचा पवित्रा विवाहितेच्या कुटुंबीयांनी घेतला याप्रकरणी जळगाव शहर पोलिसात कलम 306,498 (A) 34 प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला असून पती शेखर भास्कर गायकवाड, सासरे भास्कर दतात्रय गायकवाड ,सासु वत्सलाबाई भास्कर गायकवाड, जेठ मुकेश भास्कर गायकवाड चौघांना ताब्यात घेण्यात आले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.