विवाहितेला पती व सासऱ्याकडून पोलिसांसमक्ष मारहाण

0

जळगाव | प्रतिनिधी

वाघडी ता. चाळीसगाव येथील विवाहिता व तिचे कुटुंबिय न्यायालयीन कामकाजासाठी  जळगावात आल्याने  विवाहितेसह  तिच्या पतीत वाद  होऊन  पोलीस ठाण्यातच जोरदार हाणामारी झाल्याचा प्रकार शुक्रवारी दुपारी 1.30च्या  सुमारास शहर पोलीस ठाण्यात घडला. पोलीस ठाण्यातच हाणामारी होत असल्याचे पाहून पोलिसांनी दोघांची सुटका केली. हे प्रकार घडत असतांना या वेळी  विवाहितेची लहान बहीण व वडिलांनी पोलिसांवर धक्काबुक्की केल्याचा आरोप केला. तसेच पोलीस ठाण्यात आरडाओरड करून  गोंधळ ही घातल्याने शहर पोलीस ठाण्यात बघणाऱ्यांची गर्दी झाली होती.
चाळीसगाव  येथील रश्मी विशाल सोनवणे हिचा दि 28 फेब्रुवारी 2016 रोजी  जळगावात रिंग रोड येथील शंकरवाडीतील शिवनेरी अपार्टमेंटमधील  विशाल उत्तम सोनवणे याच्याशी विवाह झाला. लग्नानंतर अडीच महिने उलटत नाही तर तोच पतीकडून माहेरुन 10 लाख रुपये आणण्यासाठी मागणी करण्यात आली. ते न दिल्याचा राग आल्याने सासरे सेवानिवृत्त सहाय्यक पोलीस निरीक्षक व जेठ तुषार सोनवणे ( जिल्हा परिषद बांधकाम विभाग ) यांनी ही रश्मीला  अपशब्द बोलून त्याला अपमानित करून घरातून काडून दिला होता. त्यांच्या  विरोधात रश्मी यांनी जिल्हापेठ पोलिसात व यानंतर महिला दक्षता समितीकडे तक्रार ही केली होती तसेच रश्मी यांनी नांदण्यास तयार असल्याचे सांगिलते होते. तरी ही सासरच्या मंडळींकडून तिला स्वीकारण्याच्या मनस्थिती नसल्याने  महिला दक्षता येथे सुनावणीअंती याप्रकरणावर चाळीसगाव येथील न्यायालयात कामकाज सुरु आहे.तसेच रश्मीला गुन्हा मागे  घेण्यासाठी पतीकडून धमकण्यात आला तसे न केल्यास आम्ही ही तुमच्या विरोधात गुन्हा दाखल करू अशी दमदाटी करण्यात आली. तसेच पतीकडून दि 17 नोव्हेबंर 2017 रोजी     रश्मीसह तिचे आई वडील  व बहिणी यांनी शिवीगाळ तसेच मारहाण केल्याबाबत जिल्हा न्यायालयात तक्रार दाखल केली आहे. यावर जिल्हा न्यायालयात  सध्या कामकाज ही  सुरु आहे.

 

Leave A Reply

Your email address will not be published.