चाळीसगाव नगरसेवक अपात्रतेचा सहा महिन्यात निकाल द्या !

0

चाळीसगाव |  प्रतिनिधी

शहरातील प्रभाग क्र. 11(ब) मधुन निवडून आलेले भारतीय जनता पार्टी चे नगरसेवक शेखर कन्हैयालाल बजाज यांनी नाम निर्देशन पत्रा सोबत दिलेल्या मालमत्ता ही खरी नमूद केलेली नाही.तसेच एकत्र कुटूंबियांचे नावावर असलेली मालमत्ता लपविलेली आहे. तसेच लपविलेल्या मालमत्तेतून मिळणारे उत्पन्न हे सुध्दा शपथपत्रात लपवून ठेवले आहे,तसेच शपथ पत्रातील माहिती खोटी व लबाडाची असल्यामुळे जनतेची फसवणूक केल्या प्रकरणी त्यांना अपात्र करण्यात यावे या संदर्भाची तक्रार माहिती अधिकार कार्यकर्ता नारायण जेठवाणी यांनी जिल्हाधिकारी जळगाव कार्यालया कडे योग्य पुराव्यानिशी केली होती. तत्कालीन जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर यांनी दिलेल्या मोघम निकाला विरोधात नगर विकास राज्य, महाराष्ट्र शासन, मुंबई यांंच्या कडे 22/10/2018 रोजी ( /4418/. .221/-15) दाखल केली होती. त्या नंतर 06/12/2018 ला प्रथम स्मृति पत्र व 18/09/2019 ला दुसरे स्मृति पत्र शासन दरबारी दाखल केले. नगरविकास मंत्री कोणती ही कार्यवाही करत नाही म्हणून नारायण जेठवाणी यांनी निकाल लवकर लागावा म्हणून मा. औरंगाबाद खंडपीठा कडे धाव घेतली.औरंगाबाद खंडपीठात दिनांक 16/10/2019 रोजी (  .12600  2019) याचिका दाखल केली.

 

Leave A Reply

Your email address will not be published.