यावल महाविद्यालयात प्लेसमेंट सेलचे उद्घाटन

0

आपल्यातील क्षमतेचा शोध घेऊन स्वत:ला सिद्ध करा ! निलेश वानखेडे

यावल  प्रतिनिधी

कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात, यावल परिसरात बेरोजगार युवकांना नोकरीची संधी उपलब्ध व्हावी. यासाठी प्लेसमेंट सेलचे उद्घाटन करण्यात आले. कार्यक्रमाचे उद्घाटक मा. शशांक दादा देशपांडे व अध्यक्ष स्थानी प्राचार्या डॉ. संध्या सोनवणे होत्या.                    मा. शशांक दादा यांनी दीपप्रज्वलन करून प्लेसमेंट सेल चे उद्घाटन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक उपप्राचार्य प्रा. एम. डी. खैरनार यांनी केले, तर पाहुण्यांचा परिचय प्रा. मनोज पाटील यांनी केला. या कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून यावल नगरपालिकेचे नगरसेवक अतुल पाटील, माजी प्राचार्य डॉ. एफ. एन. महाजन, लक्ष्मी अग्रो केमिकल, जळगाव चे अधिकारी निलेश नारखेडे, पंकज महाजन उपस्थित होते. शशांक दादा देशपांडे यांनी प्लेसमेंट सेलचे महत्त्व सांगितले, तसेच अतुल पाटील यांनी मार्गदर्शन केले की, प्रत्येकात क्षमता असते, त्या क्षमतेच्या शोध घेऊन स्वतःला सिद्ध करा. निलेश नारखेडे यांनी विचार व्यक्त केले की, आयुष्यात प्रत्येकाने आपले ध्येय निश्चित करावे.

Leave A Reply

Your email address will not be published.