विवाहितेचा १० लाखासाठी छळ; गुन्हा दाखल

0

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क

विवाहितेला माहेरून व्यवसायासाठी १० लाख रुपये आणण्यासाठी छळ केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी पतीसह सासरच्या ३ जणांविरूद्ध रामानंदनगर पोलीसात गुन्हा दाखल झाला आहे.

जळगाव शहरातील गणपतीनगर येथील माहेर असलेल्या रेखा मराठे यांचा जळगाव शहरातीलच पार्वतीनगर येथील योगेश ऊर्फ गोविंद अरुण मराठे यांच्याशी विवाह झाला आहे. लग्नानंतर काही दिवसांनी रेखा यांनी व्यवसाय करण्यासाठी दहा लाख रुपये आणावेत यावरुन पतीसह सासरच्यांनी छळ करण्यास सुरुवात केली.

दरम्यान याच कारणावरून रेखा यास वेळोवेळी मारहाण व शिवीगाळ करत पतीसह सासरच्यांकडून शारीरिक व मानसिक छळ करण्यात आला. छळाला कंटाळून रेखा मराठे यांनी सोमवारी रामानंदनगर पोलिसात तक्रार दिली. तक्रारीवरून पती योगेश ऊर्फ गोविंद मराठे, सासू विठाबाई अरूण मराठे, जेठ डिगंबर अरुण मराठे तिघे रा. पार्वतीनगर यांच्याविरुध्द गुन्हा दाखल झाला आहे. याप्रकरणी पुढील तपास मपोहेकॉ रत्ना मराठे करीत आहे.

 

Leave A Reply

Your email address will not be published.