विल्हाळे येथील अल्पवयीन मुलीस पळविले ; दोघा विरोधात पोलीसात गुन्हा दाखल

0

वरणगाव : भुसावळ तालुक्यातील विल्हाळे येथील एका अल्पवयीन मुलीस लग्नाचे आमीष दाखवुन तीला पळवुन नेऊन अत्याचार केल्याची घटना दि २४ शनिवार घडली असून वरणगाव पोलीसात दोघा विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत वरणगाव पोलीसानी दिलेल्या माहीतीनुसार असे की  भुसावळ तालुक्यातील व वरणगाव पासुन थोड्याच अंतरावर असलेले विल्हाळे  येथील सतोष तुळशीराम भिल हे आपली पत्नी  , तीन मुली व एका मुला सोबत राहत असुन त्यांच्या मोठी मुलगी लहानपणापासुन तीची आजीच्या गावी जामनेर तालुक्यातील हिवरखेडा येथे राऊन शिक्षण घेत होती  मात्र तीन महिन्या पुर्वी आमच्या घरी देवाचे कार्यक्रम असल्याने ती मुलगी विल्हाळे येथे येऊन राहत होती याच दरम्यान माझी पत्नी हिवरखेडा येथे गेली असला तेथील तुकाराम सुकदेव भिल , सुरेश भिल , सुरेश पांडू भिल , कृष्णा सुकदेव भिल यांनी मुलीला लग्ना साठी मागणी घालीत तुझी मुलगी आमच्या घरात नाही दिली तर तील पळवुन घेऊन जावु अशी चिथावणी दिली होती त्यानंतर दि २४ शनिवार रोजी माझी पत्नी आई व मुलगी ह्या तीन्ही नैसगीक विधी आटोपुन घरी आल्या मात्र माझ पोट बिघटल आहे.

मी पुन्हा जावुन येते असे सागुन गावा बाहेर जात असताना माझी आई तीच्या मागे गेली होती थोडयाच वेळात त्याच्या मागून दुचाकी घेऊन कृष्णा सुकदेव गायकवाड व रविण खाटीक दोघे रा हिवरखेडा ता जामनेर  यांनी दुचाकीवर मुलीला जबरजस्ती बसवुन पळवुन नेले याबाबत  माझ्या सासुला हकिकत सागुन मी . माझ्या मुलीच्या शोधत निघालो असता मुलगी गंगापुर ता जामनेर येथे असल्याचे समजले तेथे विचारपुस केल्या नंतर मुलगी व कृष्णा गायकवाड हे जामनेर पोलीस स्टेशनला गेल्याचे समजले तेथे विचार केली असता कृष्णा व मुलगीला वरणगाव पोलीस घेऊन गेल्याची माहीती मिळाल्याने तेथे जाऊन मी मुली कडून विचार केल्या नंतर तीने कृष्णा हा मला लग्ना साठी नेहमी विचारत होता त्याने मला नशीराबाद येथील एका शेतात आणुन अत्याचार केल्याच सागीतले व दुचाकी चालक रविण खाटीक असल्याचे सागीतले.

या बाबत वरणगाव पोलीस स्टेशन सतोंष तुळशीराम यांच्या फिर्यादी नुसार संशयीत आरोपी कृष्णा सुकदेव गायकवाड ( भिल ) व रविण खाटीक दोघे रा हिवरखेडा यांच्या विरोधात भा द वी कलम ३७६ ( २ ) ३७६ ( २ ) (J,)३७६ ( २ ) ( K )३६३ , बालकाचे लैगीक अपराधा पासुन सरंक्षण अधिनियम ३ क ३६६ A प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असुन घटनेचा तपास प्र पोलीस अधिक्षक नितिन गणापुरे व सह फौजदार नरसिंग चव्हाण हे करीत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.