भडगाव येथे दुकानदारांवर नगरपरीषदेचा कार्यवाहीचा बङगा सुरुच

0

भडगाव (प्रतिनिधी) : नियमांचे पालन न करणार्या दुकांनदारावर  भङगाव नगर परीषद प्रशासनाकडुन दंडात्मक कारवाईचा बडगा उचलण्यात आला आहे. जो पालन करणार नाही त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल. यात कोणाची गय केली जाणार नाही असा इशारा मुख्याधिकारी विकास नवाळे यांनी दिला आहे. आतापर्यंत ८२ हजारांचा दंड वसुल करण्यात आला आहे.

कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता नगरपालिका प्रशासनाकडुन काटेकोरपणे लाॅकडाउनची अंमलबजावणी करण्यात येत आहे. सुचनांचे पालन न करणार्या ५  दुकानांना सील करण्यात आले आहे. तर  नियमांचे उल्लंघन करणाऱ्या नागरिकांवर तसेच  नियमांचे उल्लंघन करणाऱ्या नागरिकांवर आजपर्यंत तब्बल ८२ हजार १०० रुपयांचा दंड आकारण्यात आला आहे. भडगाव नगरपरिषद कडून अँटीजन टेस्टिंग ची सुविधा करण्यात आली असून त्यामुळे कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी मदत होत आहे. रिकामटेकडे फिरणार्याची पालिका व पोलिस प्रशासनाच्या वतीने एकत्रित रॅपिड टेस्ट करण्यात येत आहे.  शासनाच्या नियमांकङे दुर्लक्ष करणार्या दुकानदारांसह नागरीकांवर नगर परीषद प्रशासनाने नित्याने लक्ष ठेवावे. अन तिव्र कार्यवाहीची मोहीम राबवावी. अशी नागरीकांना अपेक्षा आहे.

दुकानदारांसह नागरीकानी कोरोनाच्या संदर्भात देण्यात आलेल्या सुचनांचे पालन करावे. अन्यथा त्याच्यांवर कारवाई करण्यात येईल..त्यात कोणाची ही गय केली जाणार नाही.

-विकास नवाळे मुख्याधिकारी नगरपरिषद भडगाव.

Leave A Reply

Your email address will not be published.