विरावली येथे आराध्या पाटील हिच्या वाढदिवसानिमित्ताने विद्यार्थ्यांना शालेय पॅड वाटप

0

विरावली, ता. यावल :– येथे  जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून आराध्या देवकांत पाटील हिच्या १ल्या वाढदिवसाच्या निमित्ताने अँड. देवकांत पाटील यांनी छत्रपती फाउंडेशनच्या वतीने तालुक्यातील विविध क्षेत्रात यशस्वी ५ महिलांचा सत्कार करुन आणि गावातील ५वी ते १२ च्या विद्यार्थ्यांना शालेय पँडचे यशस्वी महिलाच्या हस्ते वितरण करुन साध्या पद्धतीने वाढदिवस साजरा केला.

कार्यक्रमाच्या सुरवातीला राजमाता जिजाऊमाता, सावित्रीबाई फुले, रमाई आंबेडकर, अहिल्याबाई होळकर, छत्रपती शिवाजी महाराज, महाराणा प्रताप यांच्या प्रतिमेचे महिला मान्यवरांच्या हस्ते प्रतिमा पुजन केले. यात कार्यक्रमाच्या अध्यक्ष कन्या शाळेच्या माजी मुख्यधापिका सुरेख जावळे मँडम, तर उद्योजिका म्हणून दिपाली शेखर पाटील सौखेडा, तर खेळाडू म्हणून खान्देश कन्या दिशा विजय पाटील, वैद्यकीय क्षेत्रातुन डाँ. शेहनाज तडवी, उद्योजिका म्हणून प्रतिभा महेंद्र पाटील तर विद्यार्थी प्रतिनिधी म्हणून दिक्षा सोनवणे यांचा छत्रपती शिवाजी महाराज फाऊंडेशनच्या वतीने व क्षीरसागर परिवाराच्या वतीने व गावातील मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आले.

या कार्यक्रमाच्या माध्यमातून ग्रामीण भागात मुलीच्या जन्माचे स्वागत व्हावे, मुलगा-मुलगी भेदभाव होवू नये, मुली ही कोणत्याच क्षेत्रात मागे नाहीत अशी संकल्पना मानून मोठ्या प्रमाणात खर्च न करता विद्यार्थ्यांनी विविध विषयावर महिला सक्षमीकरणावर भाषण देखील केलेत. यानंतर दिशा पाटील हिला खेलो इंडियामध्ये महाराष्ट्राचे नेतृत्व करुन गोल्ड मेडल मिळाल्याबद्दल तिचे संस्थेच्या वतीने कौतुक करण्यात आले. यानंतर दिशाने आपल्या मनोगतात विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन केले. आणि तिच्या वडिलांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करत असल्याचे सांगितले. या नंतर दिशा सोनवणे यांनी सुद्धा आपल्या मनोगतात महिला कोणत्याच क्षेत्रात मागे नाही जेव्हा जेव्हा संधी मिळाली आहे, तेव्हा तेव्हा तिने संधीच सोन केलच आहे असे प्रतिपादन केले या नंतर अध्यक्षीय भाषणात मुख्याध्यापिका मँडम यांनी ग्रामीण भागात होत असलेल्या जागतिक महिला दिनाचे व वाढदिवसाचे मनापासून शुभेच्छा देत कार्यक्रमात वकृत्व स्पर्धेत सहभाग घेतलेल्या मुला-मुलींचे कौतुक केले आपल्या भाषणात सुरेखा जावळे यांनी ग्रामीण भागातील संस्कार, संस्कृती याचे खूप सुंदर स्पष्टीकरण करत कार्यक्रमातून नवी पिढी घडण्यास मदत होईल. म्हणून ग्रामीण भाग हा शहरी भागापेक्षा खुप सुसंस्कृत वातावरण पाहायला मिळते.

या कार्यक्रमाचे नियोजन छत्रपती फाऊंडेशनचे अध्यक्ष अँड. देवकांत बाजीराव पाटील क्षीरसागर परिवाराच्या वतीने केले होते. तर कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी प्रदीप पाटील, गिरीष पाटील, रणधीर पाटील, मोहीत पाटील, गजू पाटील, गुंजन पाटील, केदार पाटील, पवन पाटील, दिव्या पाटील, देवयानी पाटील, राधिका पाटील, उत्कर्षा, हर्षल, प्राजक्ता, हेमांगी, रीता, वैष्णवी, शबनम आदींनी कार्यक्रमासाठी सहकार्य केले. कार्यक्रमाला गावातील मान्यवर उपस्थित होते. त्यात गोरख पाटील, प्रताप पाटील, प्रकाश पाटील, नामदेव पाटील, रमेश तडवी, यशवंत पाटील, गोकुळ पाटील, हिरालाल पाटील, मणिज पाटील, सुरेश पाटील, त्र्यंबक पाटील, राजेश पाटील, ईश्वर पाटील, चंद्रकांत पाटील (पोलीस पाटील), लिलाधर पाटील, राजु पाटील, शिवाजी पाटील,दिनेश कुलपगारे, रवींद्र पाटील गावातील अनेक महिला पुरुष कार्यक्रमात हजर होते.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दिपाली पाटील यांनी तर सर्वांचे आभार संस्थेचे अध्यक्ष अँड. देवकांत पाटील यांनी मानले. या कार्यक्रमास महिलादिनी शेखर पाटील गटनेते पं. स. यावल, देशदूत तालुका प्रतिनिधी अरुण पाटील, अँड. भरत चौधरी, संतोष ठाकुर, नामदेव बारी, शिवाजी बारी, भूपेश पाटील, विकास पाटील यावेळी जागतिक महिला दिनाच्या व आराध्याला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा देवून संस्थेच्या वतीने घेण्यात आलेल्या कार्यक्रमाला सदिच्छा दिल्यात.

Leave A Reply

Your email address will not be published.