जळगावातील फुले मार्केटमधील कापडाच्या दुकानाला आग

0

जळगाव । शहरातील फुले मार्केटमधील एका कापडाच्या दुकानाला मध्यरात्री १२ च्या सुमारास शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याची घटना घडली. या आगीमुळे  लाखो रूपयांचा माल जळून खाक झाला आहे. करन श्रावणकुमार तलरेजा (वय-२८, रा. कंवरनगर, सिंधी कॉलनी) असे दुकान मालकाचे नाव आहे. दरम्यान, याबाबत शहर पोलीसात घटनेची नोंद करण्यात आली.

करन तलरेजा यांचे सेट्रल फुले मार्केटमध्ये पुजा कलेक्शन कापडाचे दुकान आहे. दरम्यान, बुधवारीच्या रात्री १२ वाजेच्या सुमारास शॉर्टसर्कीटमुळे आग लागली. या आगीत ड्रेस मटेरियल जळून खाक झाले असून सुमार २३ ते २६ लाख रूपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. याप्रकरणी शहर पोलीसात घटनेची नोंद करण्यात आली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.