विमा पॉलीसीच्या नावाखाली नागरिकांची फसवणुक करणारी टोळी सक्रीय : मनसेची एसपीकडे तक्रार

0

यावल, लोकशाही न्यूज नेटवर्क 

तालुक्यातील नागरीकांची विमा पॉलिसी काढुन घेण्याच्या नावाखाली काही दलालांच्या माध्यमातुन आर्थिक स्वार्थासाठी विमा उतरवुन विम्याचा लाभ मिळवुन देण्याचे आमिष दाखवुन फसवणुक करणारी टोळी सक्रीय झाली असुन अशा प्रकारे नागरीकांची फसवणुक करण्यात येत असुन तात्काळ या विषयाची चौकशी करून कारवाई करावी अशी लिखित तक्रार महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या माध्यमातुन फैजपुर विभागाचे प्रांत अधिकारी कैलास कडलग व जिल्हा पोलीस अधिक्षक डॉ . प्रविण मुंडे यांच्याकडे करण्यात आली आहे.

या संदर्भात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जनहित कक्ष जिल्हा अध्यक्ष चेतन अढळकर यांनी दिलेल्या तक्रार निवेदनात म्हटले आहे की, यावल तालुक्यातील काही दलाल हे नागरीकांना मिळणाऱ्या विमा पॉलीसीच्या नागरिकांना  लाभ मिळवुन देण्यासाठी प्रसंगी विम्याची रक्कम ही स्वताः भरून पॉलीसीचे कागदपत्रे हे आपल्याकडे ठेवुन विमाधारकाचा मृत्यु झाल्यास त्याची पडताळणी हे त्यांच्या कंपनीचे मॅनेजर , डॉक्टर, बॅंकेचे अधिकारी हे संगनमताने करून संबंधीत नागरीकांची आर्थिक फसवणुकीचा कारभार करीत आहे .

या योजने अतर्गत काढण्यात येत असलेली  विमा योजनेची पॉलीसी स्वताःच्या नावावर काढुन घेत असल्याचे गंभीर प्रकार घडत असुन या गोंधळामुळे खरे व पात्र लाभार्थी हे  विम्याच्या माध्यमातुन मिळणाऱ्या आर्थिक मदतीपासुन वंचित राहावे लागत आहे. अशा प्रकारे तालुक्यात नागरीकांची विमा पॉलीसीच्या नावाखाली फसवणुक करणारी मोठी टोळी यात काही परप्रांतीय देखील असुन ही टोळी सक्रीय असल्याची तक्रार करण्यात आली असुन, या आर्थिक स्वार्थाच्या गोंधळात नागरीकांची होणारी फसवणुक थांबवुन तात्काळ चौकशी करून कारवाई करावी अशी मागणी एका लिखित तक्रारी व्दारे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने करण्यात आली आहे.

या निवेदनावर जनहित कक्ष जिल्हा अध्यक्ष चेतन अढळकर, तालुका उपाध्यक्ष शाम पवार, शहराध्यक्ष किशोर नन्नवरे, शहर उपाध्यक्ष आबिद कच्छी, विद्यार्थी सेनेचे गौरव कोळी, तालुका उपाध्यक्ष अनिल सपकाळे यांच्या स्वाक्षरी आहे.

 

Leave A Reply

Your email address will not be published.