पाटणा, लोकशाही न्यूज नेटवर्क
दारुबंदी असणाऱ्या बिहारमध्ये विधानसभा परिसरात दारुच्या बाटल्या सापडल्याने चांगलाच गदारोळ झाला आहे. बिहार विधानसभा परिसरात दारुच्या मोकळ्या बाटल्या आढलल्या असून यामुळे एकच खळबळ उडाली आहे. दरम्यान यावरुन राजकारण रंगलं असून माजी उपमुख्यमंत्री आणि आरजेडीचे आमदार तेजस्वी यादव यांनी मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. दारुच्या बाटल्या सापडल्याने मुख्यमंत्र्यांनी आता राजीनामा दिला पाहिजे असं ते म्हणाले आहेत.
अदभुत! बिहार विधानसभा परिसर के अंदर में शराब की बोतलें बरामद।
अभी शीतकालीन सत्र चल रहा है। CM के चेंबर से मात्र चंद कदम की दूरी पर विभिन्न ब्रांड की शराब ही शराब उपलब्ध।
कड़ी सुरक्षा के बीच चालू सत्र में ही विधानसभा में शराब मिल रही है, शेष बिहार की आप बस कल्पना कीजिए! शर्मनाक! pic.twitter.com/v1Sj2kiBkK
— Tejashwi Yadav (@yadavtejashwi) November 30, 2021
विधानसभा परिसरात दारुच्या मोकळ्या बाटल्या मिळाल्याची माहिती मिळताच तेजस्वी यादव घटनास्थळी पोहोचले होते. तेजस्वी यादव यांनी ट्विटरला व्हिडीओ शेअर केला आहे. हे आश्चर्यकारक असून मुख्यमंत्र्यांच्या चेंबरपासून काही पावलांच्या अंतरावर वेगवेगळ्या ब्रॅण्डची दारु उपलब्ध असल्याचं तेजस्वी यादव यांनी म्हटलं आहे.
I asked him (Dy CM), he said that bottles of liquor were found somewhere on this campus. This is extremely bad. How can this be tolerated? I say this before the Speaker, if he permits I'll ask everyone to examine it today itself: Bihar CM in Assembly
(Source: Bihar Vidhan Sabha) pic.twitter.com/iz8Xt3c0G9
— ANI (@ANI) November 30, 2021
इतक्या कडक सुरक्षेत सुरु असलेल्या अधिवेशनादरम्यानही विधानसभेत दारु मिळत असेल तर उर्वरित बिहारची फक्त कल्पना करा असं म्हणत तेजस्वी यादव यांनी हे लाजिरवाणं असल्याचं म्हटलं आहे.
विरोधी पक्षनेते असणाऱ्या तेजस्वी यादव यांनी या घटनेचा निषेध करत मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी केली असून संपूर्ण राज्यात पूर्णपणे दारुबंदी लागू करावं असं म्हटलं आहे. “हे अत्यंत गंभीर प्रकरण आहे. राज्यभरात दारुच्या बाटल्या सापत आहेत. दारुवर पूर्ण बंदी असली पाहिजे,” असं तेजस्वी यादव म्हणाले आहेत.
नितीश कुमारांची प्रतिक्रिया
नितीश कुमार यांनीदेखील हे गंभीर प्रकरण असल्याचं मान्य करताना याची चौकशी केली जाईल अशी माहिती दिली. “हे अत्यंत गंभीर प्रकरण आहे. याचा तपास होणं गरजेचं आहे. जर अध्यक्षांनी परवानगी दिली तर आम्ही मुख्य सचिव आणि डीजीपींना याचा तपास करायला सांगू शकतो,” असं नितीश कुमार म्हणाले आहेत.
आमदारांमध्ये वाद
बिहार विधानसभा हिवाळी अधिवेशनाचा आज दुसरा दिवस आहे. मात्र कामकाज सुरु होण्याआधीच दारुबंदीवरुन राष्ट्रीय जनता दलाचे आमदार भाई वीरेंद्र आणि भाजपाचे आमदार संजय सरावगी यांच्यात वाद झाला. प्रकऱण इतकं वाढलं की राष्ट्रीय जनता दलाच्या आमदाराने भाजपा आमदाराला शिव्या देण्यास सुरुवात केली.