विकास कामाला खोडा नाही ;मात्र बेकायदेशीर बांधकाम होवु देणार नाही- गोविंद शिरोळे 

0

 

पारोळा – येथील सुरु असलेल्या क्रिडा संकुलाचे बांधकामात व्यापारी गाळ्यांना परवानगी नसतांना अनाधिकृतपणे बांधकाम करण्यात येत आहे.
हे बेकायदेशीर बांधकाम जिल्हाधिकारी यांनी थांबविले आहे.शहराच्या विकास कामांना गेल्या ४ वर्षात राजकिय खोडा आणला नाही.नियमानुसार कामांना आम्ही सहकार्य करु.पण नियमबाह्य व मंजुरी नसलेल्या कामांना विरोध करु.अशी माहीती शहर विकास आघाडीचे प्रमुख माजी नगराध्यक्ष गोविंद शिरोळे यांनी पत्रकार परिषदेत दिली.

याबाबत त्यांनी स्पष्ट केले कि,न पा हद्दीतील गट क्र २४४/२ सि.स नं.३४३ या जागेत ता,६ जाने.२०१८रोजी क्रिडा संकुल बांधणेबाबत ठराव करण्यात आला.विशेष म्हणजे सदर ठरावात व्यापारी गाळे बांधकामाचा विशेष नसल्याने आमच्या श वि.आ च्या नगरसेवकांनी शहराच्या विकासाचा विषय असल्याने मंजुरी दिली.परंतु सदर जागेत व्यापारी गाळे बांधण्यात येवुन त्याबाबतचा विस्तारित ठराव हा २८जुलै २० च्या बैठकित घेण्यात आला.त्यावेळी आम्हांला सदर कामकाजाबाबत शंका निर्माण झाल्याचे लक्षात आले.एकीकडे जनरल बोर्ड ला सर्वाच्च अधिकार असतांना व्यापारी गाळे बांधकामबाबत अंधारात ठेवले गेल्याचा आरोप त्यांनी करित राष्ट्रीय महामार्ग  असलेल्या व्यापारी गाळे लागुन हे नगर रचनेच्या नियमाप्रमाणे आवश्यक ते चटईक्षेत्र सोडण्यात आले नाही.विशेष म्हणजे ता,२८जुलै २० च्या विस्तारीत ठरावाबाबत मुख्खाधिकारी यांच्या टिपणीत स्पष्ट करण्यात आले होते कि,सदर विषयास मंजुरी घेणे आवश्यक आहे.व आमच्या गटाची हिच मागणी असुन याबाबत सदर काम हे नगर रचनेच्या निकषानुसार नसल्याने याबाबत मंजुरी न घेता ही नपाने व्यापारी गाळ्यांचे ८०टक्के बांधकाम करुन त्या कामातील रक्कम ४४लाख ५४हजार ६६६ संबंधित बांधकाम ठेकेदाराला वितरीत करण्यात आला आहे.या प्रकियेत तत्कालिन मुख्खाधिकारी,अभियंता,लेखापाल व पदाधिकारी यांचा संगनमतचा असल्याचा आरोप गोविंद शिरोळे यांनी केला.तसेच पुढील बिले काढणेबाबत तत्कालीन मुख्खाधिकारी यांनी नकार दिल्यामुळे त्यांची तडकाफडकी बदली करण्यात आली असल्याचा आरोप देखील श्री शिरोळे यांनी केला.

यावेळी त्यांनी पत्रकार परिषदेत माहीती दिली कि,सदर क्रिडा संकुलनाचा प्रस्ताव सन २०१२मध्ये आमच्या काळात दिला गेला होता.त्यात व्यापारी गाळे बांधकामाचा विषय नव्हता.सदर विषयात शासकिय नियम धाब्यावर बसवुन बेकायदेशीरपणे बांधकाम करित असल्याने आम्ही याबाबत जिल्हाधिकारी व नगररचना विभागाकडे पुराव्यासह तक्रारी केल्या म्हणुन सत्ताधारी गटाने आमची सेटींग झाल्याची अफवा व बदनामी केल्याचे देखील ते यावेळी म्हणाले.

या क्रिडा संकुलनाच्या सुरु असलेल्याव बांधकामाची प्रत्यक्ष पाहणी नगररचना विभागाच्या अधिकारी यांनी केली असता हे बांधकाम मंजुरी व नियमाप्रमाणे नसल्याचे पालिकेशी पत्रव्यवहार करुन सुधारित बांधकाम नकाश्यांना मंजुरी देता येणार नाही असे स्पष्ट केले.यानंतर नगर रचना विभागाने

स्थगिती असतांना देखील पालिकेकडुन नियमबाह्य क्रिडा संकुलनाचे काम सुरुच होते. याबाबत मी जिल्हाधिकारी यांच्याकडे तक्रार केली.व २२ नोव्हे.२० रोजी जिल्हाधिकारी यांनी सदर बांधकाम  सहाय्यक संचालक नगर रचना विभाग जळगांव यांचेकडुन सुधारित फेरप्रस्ताव मंजुरी मिळेपर्यत स्थगित ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी जळगांव यांचेकडुन करण्यात आल्याची माहीती त्यांनी दिली.

शहराचा विकास पाहता विस्तारित बांधकाम आराखड्यास नगर रचना विभागाने मंजुरी दिल्यास त्याला आमची हरकत असणार नाही असे स्पष्ट केले.

निविदाप्रमाणे सदर कामाचे १४ महीने संपले असुन उर्वरित ४महीन्यात क्रिडा संकुलाचे काम उभे राहणार कि रखडणार याबाबत याकडे शहरवासियांचे लक्ष लागुन आहे.

यावेळी पत्रकार परिषदेत श वि आघाडीचे नगरसेवक महेश चौधरी,अशोक चौधरी,गौतम वानखेडे,चंद्रकांत शिरोळे,विकास शिरोळे उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.