वाहनाच्या धडकेत अज्ञात वृद्धेचा मृत्यू

0

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क 

जळगाव तालुक्यातील आमोदा ते घार्डी रोडवर अज्ञात वाहनाच्या धडकेत अनोळखी वृध्देचा मृत्यु झाल्याची घटना घडली. याप्रकरणी तालुका पोलिसात अकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली आहे.

सदर व्यक्तीचे  वय ७० ते ७५ वर्ष अंगात स्वेटर, पांढरे केस असे मयत वृद्धेचे वर्णन आहे. घटनेची माहिती मिळाल्यावर वृद्धेला जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात असून या ठिकाणी वैद्यकीय अधिकार्यांनी मयत घोषित केले.

याप्रकरणी आमोदा येथील पोलीस पाटील राहुल पाटील यांच्या खबरीवरुन तालुका पोलिसात अकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली आहे. मयत वृद्धेची ओळख पटविण्याचे आवाहन तालुका पोलिसांनी केले आहे. वृद्धेच्या ओळख पटविणे कामी कुणाला काहीही माहिती मिळाल्यास विश्वनाथ गायकवाड मोबाईल क्रमांक ९५९४९४१६१५  यांना संपर्क साधावा असे कळविण्यात आले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.