वाढीव बिल कमी करावे अन्यथा….मनसेचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन

0

जळगाव । राज्यात वाढीव बिलाचा सर्वसामान्यांना शॉक बसला आहे. या वाढीव वीजबिल माफीसाठी मनसेने संपूर्ण राज्यात जोरदार झटका आंदोलन सुरू केलं आहे. जळगावातही मनसेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले. तसेच विविध मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकारी यांना देण्यात आले.

कोरोनाच्या काळात अनेकांच्या नोकऱ्या गेल्या, उद्योगधंदे बंद होते अशा परिस्थितीत नागरीक अडचणीत असताना देखील महाविकास आघाडीच्या सरकारने विज बिलात मोठ्या प्रमाणावर वाढ केली आहे. वर्षभराचे एकुण येणारे विज बिल हे एकाच वेळी आल्याने ग्राहकांची मोठी कोंडी झाली आहे. ग्राहकांचे वाढलेले वीजबिल वारंवार कमी करा अशी मागणी करूनही सरकारकडून विज बिल कमी करण्यात आलेले नाही याच्या निषेधार्थ आज जिल्ह्यातील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने आंदोलन करण्यात आले. सरकारने वाढीव बिल कमी करावे अन्यथा जनतेच्या वतीने सरकारला शॉक द्यावा लागेल असे भावना व्यक्त करत निषेध केला आहे.

या निवेदनावर ॲड. जयप्रकाश बाविस्कर, जमील देशपांडे, मुकुंदा शेटे, विनोद शिंदे, आशिष सपकाळे, अशोक पाटील, पंकज चौधरी, योगेश पाटील, राजेंद्र निकम, विनोद पाठक, राहुल काळे, गणेश नेरकर, चेतन आडकर, बळीराम पाटील, नीलेश खैरणार, अक्षय राजपूत, सचिन कापडे, महेश माळी, श्रीकृष्ण मेंडके, तुषार साळुंके, किशोर पाटील, अमोल वाणी, सागर अत्तरदे, तुषार पाठक, तुषार तळेले, रज्जाक सय्यद, गोविंदा जाधव, शाहिद खाटीक, अमोल माळी आदी उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.