वसंतराव नाईक महामंडळाचा निधी गोठवण्याचे प्रयोजन काय? डॉ.मोरसिंग राठोड

0

चाळीसगाव :-
चाळीसगाव येथे नुकताच राजपूत मंगल कार्यालय मध्ये संपन्न झालेल्या बंजारा समाजाच्या मेळाव्यास संबोधित करताना ,बंजारा समाजाचे राष्ट्रीय अध्यक्ष व वंचित बहुजन आघाडीचे नेते डॉक्टर मोर सिंग राठोड म्हणाले की स्वर्गीय वसंतराव नाईक व स्वर्गीय सुधाकरराव नाईक यांच्यानंतर प्रस्तापित राजकारण्यांनी बंजारा समाजावर अन्यायच केला, आजही हा समाज डोंगर पायथ्याशी तांडा वस्तीवर राहून व ऊस तोडणी सारखे उपजीविकेचे साधन शोधत आहे,
त्यातच वसंतराव नाईक महामंडळास मिळणारा निधी या प्रस्थापित जातीयवाद्यांनी सरकारने गोठवण्याचे प्रयोजन काय? यामुळे वंचित बंजारा समाज विकासाच्या प्रक्रियेपासून दुरावा म्हणून तर नाही ना ?
देशात 12 कोटी बंजारा समाज असून राज्यातही त्यांची संख्या फार मोठी आहे म्हणून आपल्या बंजारा समाजास विकासाच्या प्रक्रियेत आणण्यासाठी आपल्या बंजारा समाजातूनच नेतृत्व पुढे आले पाहिजे .आणि त्यासाठी मी आपल्या या विकासा पासून वंचित असलेल्या घटकांचा प्रतिनिधी म्हणून चाळीसगाव विधानसभा मतदारसंघाच्या निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीचा उमेदवार असणार असल्याचे सांगितले. यावेळी तालुका वंचित आघाडीचे अध्यक्ष संभाजी जाधव यांनी आपले मनोगत व्यक्त करताना सांगितले की आतापर्यंत दलित समाजाचे नेत्यांनी स्वतःचा विकास केला. परंतु समाजाला विकासाच्या प्रक्रियेपासून वंचित ठेवले त्यासाठी आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांशी एकमत होऊन बारा बलुतेदार यांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी आमचे नेते ‌ बाळासाहेब प्रकाश आंबेडकर हे वंचित बहुजन समाजाला नेतृत्व लाभले आहे
त्यासाठी त्यांच्या पाठीशी आपण खंबीरपणे उभे राहिले पाहिजे असे सांगितले .
यावेळी बंजारा समाजाचे तालुक्यातील जवळपास बावन तांडा वस्ती चे सरपंच उपसरपंच विकास सोसायटीचे चेअरमन, संचालक, ग्रामपंचायतीचे सदस्य ,असे हजारो महिला व पुरुष उपस्थित होते .
यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भारतीय बहुजन बंजारा क्रांती दलाचे प्रदेशाध्यक्ष नंदू भाऊ पवार होते व्यासपीठावर बंजारा टायगरचे राष्ट्रीय अध्यक्ष आत्माराम जाधव ,पक्षाचे प्रवक्ते श्याम मुंडे ,वंचित बहुजन आघाडी चे तालुकाध्यक्ष संभाजी जाधव ,गणेश अष्टेकर, रतन जाधव ,अशोक राठोड ,रुपेश जाधव ,राजू चव्हाण ,विश्वजीत नाईक साहेब ,खानदेश प्रांताध्यक्ष ईश्वर राठोड, तालुकाध्यक्ष संजय राठोड ,विकास राठोड ,गंगाराम राठोड, राजाराम सोनार ,आदी उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आत्माराम चव्हाण यांनी केले.

Leave A Reply

Your email address will not be published.