वरणगावातील डॉक्टर कोरोना पॉझीटिव्ह

0

वरणगाव | शहरातील अक्सानगर परिसरात रहिवाशी असलेल्या डॉक्टरचा स्वॅब अहवाल शनिवारी रात्री उशीरा कोरोना पॉझिटिव्ह आला असुन कोरोना बाधीताची संख्या तीन झाली आहे तर या अधिच्या बाधीताच्या संपर्कातील वीस लोकाचे स्वॅब निगेटिव्ह आहे.

दोन महिण्या पासुन थैमान घतलेला कोरोनाने मंगळवारी शहरात धडक देत पहिला कोरोना रूग्ण मिळाला होता त्याच्या दुसऱ्याच दिवशी दुसरा रुग्ण आढळला होता त्या पाठोपाठ आता शहरातील अक्सानगर परिसरात रहिवाशी असलेल्या तीस वर्षीय डॉक्टरा स्वॅब अहवाल पॉझिटिव्ह आला आहे तर या पुर्वीच्या दोन रुग्णाच्या सपर्कातील वीस लोकाचा अहवाल निगेटिव्ह आला असुन डॉक्टरच्या सपर्कात असलेल्याना भुसावळ येथील कोवीड सेंटर मध्ये पाठविण्याची व्यवस्था करण्यात आली असल्याची माहिती डॉ नितिन सोनवणे यांनी दिली

Leave A Reply

Your email address will not be published.