वरणगावला प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचा निषेध

0

वरणगाव : ओबीसीचे नेते मा छगन भुसबळ यांच्या बद्दल सुडभावनेने व मगरुरीची भाषा वापरणाऱ्या भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचा शहर माळी समाजाच्या वतीने जाहीर निषेध नोंदवित त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी निवेदन देऊन करण्यात आली आहे.

महाराष्ट्रातील ओ बी सी व राष्ट्रवादी कॉग्रेस पार्टीचे नेते मा छगन भुजबळ यांनी प बंगला मधील निवडणुकी बाबत प्रसार मध्यामा सोबत बोलताना टि एम सी नेत्या ममता बॅनजीचे कौतुक करीत झासीच्या राणी प्रमाणे लढल्या  व निवडणुक जिंकल्याची प्रतिक्रीया दिल्या नतंर भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मा छगन भुजबळ यांना तुम्ही जामीनावर सुटला आहे हे विसरू नका अशी धमकी देत सुड भावनेनुन व मगरुरीची भाषा वापरणाऱ्या चंद्रकांत पाटील यांचा जाहीर निषेध व्यक्त करीत वरणगाव पोलीस स्टेशनला निवेदन देऊन त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी करण्यात आली आहे

निवेदन देतेवेळी सतोंष माळी, प्रल्हाद माळी, विजय माळी, निलेश माळी, टिनु माळी, आकाश महाजन, विवेक माळी, भुषण माळी, संजय माळी विशाल माळी, वैभव माळी इत्यादी उपस्थीत होते.

Leave A Reply

Your email address will not be published.