वडोदा क्षेत्रातील मधापुरी गावालगत नियात क्षेत्रात शेकडो झाडांवर कुऱ्हाड

0

कुऱ्हा काकोडा, ता.मुक्ताईनगर (प्रतिनिधी) – कुऱ्हा काकोडा वडोदा वनक्षेत्रातील चारठाणा नियत क्षेत्रात वनखंड क.न.५६८ मध्ये मधापुरी येथील गावालगत जंगलात स्थानिक आदिवासी फासेपारधी समाजातील महिला व व अल्पवयीन मुलं व मुली यांनी अवैध वृक्षतोड करून अतिक्रमणाचा प्रयत्न करीत आहे.  त्यामध्ये बांबूड , सोनई खैर अशा प्रकारच्या वृक्षाची गेल्या दोन दिवसापासून दिवसाढवळ्या वृक्षतोड करण्यात येत आहे.

यामध्ये वन विभागाचे कर्मचारी त्यांना समजून घेण्याचा प्रयत्न करीत आहे. मात्र, अतिक्रमण करणारे ऐकत नसल्याने बंदोबस्त करण्यासाठी सी. आर.एफ तुकडी व वडोदा वनक्षेत्रपाल अमोल चव्हाण तसेच डी डब्ल्यू पगार उपवनरक्षक जळगाव,  सी कांबळे सहाय्यक वनरक्षक व बी एस पाटील फिरते पथक तसेच रावेरचे एपीआय राहुल वाघ व मुक्ताईनगर चे पीएसआय साळुंके, कुऱ्हा दूर क्षेत्राचे पोलीस कर्मचारी व होमगार्ड घटनास्थळी जाऊन अतिक्रमण झालेले क्षेत्रात बंदोबस्त लावला आहे.  तसेच तेथील अतिक्रमण धारक महिलांची समजूत काढण्याचा काढण्याचा प्रयत्न करत आहे व त्यांना तुम्ही नियमाने शासनाकडे अर्ज करा कायदा हातात घेऊ नका असे सांगत आहे.

सदर अतिक्रमण धारक महिला व अल्पवयीन मुली व मुले असल्यामुळे गेल्या दोन दिवसापासून हा प्रकार चालू आहे वन विभागाकडे कर्मचारी अभाव असल्यामुळे वनविभागातील वरिष्ठ अधिकारी व व पोलीस प्रशासन महिलांची मुलींची समजूत काढत आहे. सदर अतिक्रमण धारक महिला मुली याबाबत वृत्त लिहीपर्यंत याबाबत शासन काय निर्णय घेणार याकडे वृक्षप्रेमी वन्यप्रेमी व परिसरातील नागरिक वाट  पाहत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.